कोल्हापूर : ५ कुटुंबांना मोफत शेळी वाटप उपक्रम

कोल्हापूर -ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांना स्वयंपूर्ण होता यावं, उदरनिर्वाह चालण्यासाठी कष्ट आणि नियोजन यांची जोड मिळावी, याकरता भागीरथी महिला संस्था आणि युवती मंच प्रयत्नशील आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, भागीरथीच्यावतीनं मोफत शेळी वाटपाचा उपक्रम जिल्हाभर राबवण्यात येतोय. उदरनिर्वाहा अभावी कोणत्याही निराधार कुटुंबाला दुःख आणि वेदना सहन कराव्या लागू नयेत, असा निर्धार भागीरथी संस्थेनं केलाय.

भविष्यात या उपक्रमाची व्याप्ती वाढवून, अनेक निराधार कुटुंबांना शेळी वाटपाद्वारे उदरनिर्वाहाचं साधन उपलब्ध करुन देण्यासाठी संस्था कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांनी केले. आजरा तालुक्यातील चांदेवाडी इथं, मोफत शेळी वाटप उपक्रमात त्या बोलत होत्या.

ग्रामीण भागामध्ये अनेक कुटुंबांना आजही उदरनिर्वाहाचं साधन उपलब्ध नाही. रोजगाराअभावी अनेक कुटुंबांची फरफट होतीय. या कुटुंबांना दोनवेळची भाजीभाकरी सुखानं खाता यावी, या हेतूनं भागीरथी महिला संस्थेनं, मोफत शेळी वाटप उपक्रम सुरु केलाय. या उपक्रमांतर्गत गरीब आणि गरजू कुटुंबांना मोफत शेळी देण्यात येते. या शेळीच्या पालनपोषणातून त्या कुटुंबाला रोजगाराची संधी उपलब्ध होतं आहे. या अंतर्गत  चांदेवाडी या ठिकाणी शेळ्यांचे वाटप करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)