कोल्हापूर हाऊसफुल्ल; सलग सुट्ट्यामुळे पर्यटकांची गर्दी

कोल्हापूर – महावीर जयंती,गुड फ्रायडे आणि जोडून आलेले शनिवार व रविवार या चार दिवसांच्या सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी कोल्हापूरमध्ये गर्दी केली आहे. पर्यटनाचा आनंद घेत असतानाच करवीर निवासिनी अंबाबाई दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासून मंदिरात गर्दी केली होती .अंबाबाई दर्शनानंतर अस्सल कोल्हापुरी पदार्थांचा आस्वाद घेत खरेदीचा आनंदही लुटला. दिवसभर प्रेक्षणीय स्थळांना भेटी दिल्या.

महावीर जयन्ती, गुड फ्रायडे  आणि  चौथा शनिवार, रविवार या  सलग सुट्ट्यांची  पर्वणी साधत पर्यटक  गुरुवारपासूनच  कोल्हापुरात दाखल झाले आहेत . कुटुंबांसह पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी करवीर निवासिनी अंबाबाई आणि भवानी मातेचे दर्शन घेतल्यानंतर अनेक ऐतिहासिक स्थळांनी भेटी दिल्या.  अंबाबाई दर्शनासाठी तर भाविकांनी पहाटेपासून गर्दी केली होती. अंबाबाई मंदिरात होणारी गर्दी लक्षात घेऊन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने भाविकांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी मंडप, पिण्यासाठी पाणी आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नेमणूक केली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)