कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला भूकंपाचे सौम्य धक्के

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यतील वारणा खोरे आणि सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्‍यातील चांदोली धरण परिसरात सौम्य स्वरुपाचे दोन भुकंपाचे धक्के बसले. सुदैवाने यामध्ये कोठेही कोणत्याही प्रकारची जिवित अथवा वित्तहानी झाली नाही. शिराळा तालुक्‍यातील चांदोली धरण परिसरात रविवारी सकाळी व दुपारी सौम्य स्वरुपाच्या दोन भुकंपाच्या धक्‍क्‍यांनी हा परिसर हादरुन गेला.

अधिक माहिती अशी की, वारणा खोरेसह चांदोली धरण परिसरात आज सकाळी 07 वाजुन 48 मिनीटांनी 2.8 रिस्टर स्केलचा पहीला भुकंपाचा धक्का जानवला.त्यांनंतर दुपारी 01 वाजून 35 मिनीटांनी 3.1 रिस्टर स्केलचा दुसरा भुकंपाचा धक्का जाणवला. या भुकंपाचा केंद्रबिंदु वारणावतीपासुन पश्‍चिमेकडे 16 किलोमीटर अंतरावर असल्याचे सांगण्यात येत आहे. या भुकंपामुळे चांदोली परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)