कोल्हापूर सर्किट बेंच’ जागेबाबत सोमवारी पुण्यात बैठक

कोल्हापूर – मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात उभारण्यासाठी शेंडा पार्क येथील जागेबाबत चर्चा करण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी खंडपीठ कृती समितीला सोमवार (दि. 16) पुणे येथे बैठकीचे निमंत्रण दिले आहे. शासनाने सकारात्मक पावले उचलण्यास सुरुवात केली असून, लवकरच जागेचा प्रश्न मार्गी लागेल, अशी माहिती खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक ऍड. प्रशांत चिटणीस यांनी दिली.

कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर या सहा जिल्ह्यांसाठी होणाऱ्या सर्किट बेंचसाठी कोल्हापुरात शेंडा पार्कातील सुमारे 75 एकरांची विस्तीर्ण जागा निश्‍चित करण्यात यावी, अशी मागणी गेल्या महिन्यात मुंबई येथे खंडपीठ कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)