शिक्षकांची शासनाविरोधात महाआरती
कोल्हापूर: शिक्षक दिनी राज्यातील ४५ हजार कायम विना अनुदानित शिक्षक रस्त्यावर उतरले आहेत. शिक्षण मंत्र्यांनी मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देऊन देखील मागण्या मान्य न झाल्याने कोल्हापुरातील शिक्षकांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर महाआरती करत शासनाचा निषेध केला.
कोल्हापुरातील शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर शिक्षक दिना दिवशीच शासनाच्या चुकीच्या धोरणांच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शिक्षक कृती समितीच्या वतीने महाआरती आयोजन  केलं होतं. राज्यातील कायम विनाअनुदानित या मधील कायम शब्द काढून शाळांना 20 टक्के अनुदान सरकारने सुरू केले आहे. त्याचा कालावधी उलटला आहे. या सर्व शाळा 80% अनुदानास पात्र होत आहेत. या शाळेत शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांना 80 टक्क्यांनी वेतन मिळाले पाहिजे , पण सरकार या मागणीकडे  सोयीस्कर दुर्लक्ष करत आहे. शासन वेतन अनुदानाची आर्थिक तरतूद करत नाही,  ती करावी आणि चालू वर्षापासून शिक्षकांना वेतन द्यावं या मागणीसाठी आज हे आंदोलन करण्यात आलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)