कोल्हापूर : व्यक्तीमत्व विकास शिबीराचा समारोप समारंभ अभूपूर्व उत्साहात संपन्न

कोल्हापूर  – प्राथमिक शिक्षण समिती, महानगरपालिका, कोल्हापूर आयोजित राष्ट्र सेवा दल यांच्या सहकार्याने महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांचा तीन दिवसीय व्यक्तिमत्व विकास शिबीराचा सांगता समारंभ रविवार 22 एप्रिल 2018 रोजी कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर स्वाती यवलुजे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी प्राथमिक शिक्षण समिती सभापती वनिता अशोक देठे या अध्यक्षस्थानी होत्या. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांची शोध घेवून त्यांचा विकास करते ते शिक्षण. सदर शिबीरात विद्यार्थ्यांना आपल्या अंगी असलेल्या कला गुण सादर करता आले. यातून विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगी असलेल्या कलाकौशल्याची जाणीव होवून आत्मविश्वासाची कवाडे खुली करणेचे महत्वाचे काम या व्यक्तिमत्व विकास निवासी शिबीरामधून करणेत आले.

शिबीराचे समारोप कार्यक्रमात तीन दिवस झालेल्या कार्यक्रमाचे अहवाल वाचन प्रशासनाधिकारी एस. के. यादव यांनी केले. शिबीराच्या काटेकोर व नेटके नियोजनासाठी नियुक्त करणेत आलेल्या पथक प्रमुखांचा सत्कार महापौर सौ. स्वाती यवलुजे यांचे हस्ते करणेत आला. प्राथमिक शिक्षण समितीच्या सभापती सौ. वनिता अशोक देठे यांनी हे शिबीर कोणतेही शासकीय अथवा महानगरपालिका कोल्हापूर कडील निधी न घेता संपूर्ण शिबीर लोकसहभागातून घेणेत आले असले बाबत नमूद केले. हे शिबीर यशस्वी करणेसाठी आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटीलसाहेब, आमचे गटनेते शारंगधर देशमुखसाहेब, महानगरपालिकेकडील सर्व पदाधिकारी, अधिकारी यांनी केलेली आर्थिक व वस्तुरुपातील मदत तसेच समाजातील दानशुर व्यक्ती वडणगे-पाडळीचे सरपंच सचिन चौगुले, प्रयाग चिखलीचे माजी सरपंच केवलसिंह रजपूत यांनी शुध्द पिण्याच्या पाण्याचा टॅन्कर शिबीर कालावधी उपलब्ध करुन देवून मोलाचे सहकार्य केले त्यांचे आभार मानले. शिबीरासाठी निश्चित केलेल्या विविध कमिटीमधील कार्यालयीन कर्मचारी, शिक्षक, विविध संघटना यांचे रोपे देवून सत्कार करुन आभार मानले.

शिबीर कालावधीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमधून त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेवून कु. हर्षद नाकाडे, म.न.पा. श्रीम. लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर व कु. ऐश्वर्या संजय कांबळे म.न.पा.हिंद विद्यामंदिर या विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिबीरार्थी म्हणून ट्रॉफी व प्रशस्तीपत्रक देवून गौरविणेत आले. तसेच प्राथमिक शिक्षण समिती, कार्यालयीन कर्मचारी यांचे वतीने शिबीरामध्ये सहभागी झालेल्या शिबीरार्थी विद्यार्थ्यांमधून शिबीर कालावधीत उत्तम कार्य करणाऱ्या एका शिबीरार्थ्यांस बक्षिस स्वरुपात सायकल देणेचे निश्चित करणेत आले होते. त्यानुसार म.न.पा. संत रोहिदास विद्यामंदिर या शाळेकडील कु. ओम माने या विद्यार्थ्यांने सर्वोकृष्ट शिबीरार्थी होण्याचा मान मिळवला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)