कोल्हापूर : वैद्यकीय महाविद्यालय मेडिकल हब म्हणून विकसित करणार – चंद्रकांत पाटील

File Photo

कोल्हापूर – राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास आवश्यक वैद्यकीय सुविधा देण्याबरोबरच या परिसरात येत्या दोन वर्षात हाती घेतलेले विविध वैद्यकीय प्रकल्प मार्गी लावून, हा परिसर मेडिकल हब म्हणून विकसित करण्याचा मानस पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे बोलताना व्यक्त केला.

शेंडापार्क येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात सुमारे 72 कोटी 26 लाख रुपयांच्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते आज झाले. त्यावेळी ते बोलत होते. यासमारंभास आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल.एस.पाटील,  सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सदाशिव साळुंखे, प्रभारी वास्तु शास्त्रज्ञ संजय गेडाम, कार्यकारी अभियंता आर.एस.पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

वैद्यकीय सुविधेपासून कोणीही व्यक्ती वंचित राहू नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यास शासनाचे प्राधान्य असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे राज्यातील सर्व सुविधायुक्त आणि आदर्श महाविद्यालय म्हणून विकसित करण्याबरोबरच यापरिसरात 700 बेडचे हॉस्पिटल, 100 बेडचे महिला हॉस्पिटल, दंत महाविद्यालय, कॅन्‍सर तपासणी सेंटर असे विविध वैद्यकीय प्रकल्प विकसित करण्यासाठी शासनस्तरावर निश्चितपणे पाठपुरावा करुन हा परिसर मेडिकल हब म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले.  या महाविद्यालयाच्या उभारणीमध्ये माजी मंत्री स्वर्गीय दिग्वीजय खानविलकर यांचे बहुमोल योगदान लाभले असून त्यांच्या योगदानाबद्दल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सामाधान व्यक्त केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)