कोल्हापूर : वीजबिल भरणा केंद्रे 24 व 25 रोजी सुरू राहणार

कोल्हापूर –   कोल्हापूर परिमंडळात वीजबिल वसु लीची मोहीम सुट्टीच्या दिवशीही सुरु राहणार असुन वीजग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी  दि. 24 व 25 मार्च रोजी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील महावितरणची सर्व  अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे सु रु राहणार आहेत.कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील महावितरणची शून्य थकबाकी मोहीम सुरू आहे. ज्या ग्राहकांनी वीजबिल थकवले आहे त्यांचा वीजपुरवठा प्राधान्याने खंडित केला जात आहे. खंडित केलेला वीजपुरवठा चालू बिलांसह थकबाकी तसेच पुनर्रजोडणी शुल्क भरल्याशिवाय जोडला जाणार नाही. दरम्यान पुढील दोन दिवस चौथा शनिवार (दि. 24) व रविवारची (दि. 25) सार्वजनिक सुट्टी आली आहे. या कालावधीत कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील महावितरणची सर्व अधिकृत वीजबील भरणा केंद्रे कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहेत.

अधिकृतवीजबील भरणा केंद्रांसह  www.mahadiscom.in या संकेतस्थळावर तसेच मोबाईल अॅपद्वारे ऑनलाईन वीजबिल भरण्याची सुविधा सहज उपलब्ध आहे. छापील बिलांऐवजी वीजबिलाचा मोबाईल संदेश दाखवून देखील बिल भरता येते. ग्राहकांनी संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी चालू देयकांसह थकबाकीचा त्वरीत भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची नामुष्की टाळावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)