कोल्हापूर विमानतळाचे “छत्रपती राजाराम महाराज विमानतळ’ नामकरण

विधानसभेत शाशकीय ठराव संमत 

मुंबई – कोल्हापूर येथील विमानतळाचे “छत्रपती राजाराम महाराज विमानतळ’ असे नामकरण करण्यात येणार आहे. या नामकरणाबाबत वेैंद्र सरकारला शिफारस करण्याचा शासकीय ठराव विधानसभेत एकमताने संमत करण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा शासकीय ठराव मांडला व सभागृहात तो एकमताने संमत करण्यात आला. या ठरावाबद्दल शिवसेनेचे आमदार राजेश क्षिरसागर, प्रकाश आबिटकर यांनी कोल्हापूरकरांच्यावतीने मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

क्षीरसागर यांनी यावेळी शाहूमहाराजांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची शिफारसही केंद्र सरकारला करावी अशी मागणी केली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कोल्हापूर येथे लवकर नागरी विमानसेवा सुरू करावी असे मत व्यक्त केले. राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांची मान्यता मिळाल्यानंतर हा प्रस्ताव नागरी विमानचालन मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)