कोल्हापूर: लॉकअप तोडून 4 आरोपींचे पलायन

कोल्हापूर – शाहूवाडी पोलीस ठाण्यातील लॉकअपच्या दरवाजाचे ग्रील उचकटून 4 कुख्यात आरोपींनी पलायन केल्याची घटना आज पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास घडली. या चारही आरोपीवर दरोडा, घरफोडीचे गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत. ड्युटीवर असणाऱ्या पोलिसांनी कामचुकारपणा केल्याची चर्चा पोलीस ठाण्याच्या आवारात सुरू आहे. या प्रकारामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शाहूवाडी परिसरातील घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्याची चौकशी करण्यासाठी रेकॉर्ड वरील सुरज सर्जेराव दबडे, ओंकार महेश सुर्यवंशी, गोविंद वसंत माळी, विराज गणेश कारंडे या चार आरोपींना शाहूवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पोलीस कोठडीत असणाऱ्या या चार आरोपींनी रात्रीच्यावेळी बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांना पहाटे चारच्या सुमारास डुलकी लागली. याचा फायदा घेऊन चोरट्यांनी लॉकअपचा दरवाजा उचकटला आणि धूम ठोकली. शाहूवाडी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पहाटे आरोपीनी पोलिस कोठडीतून पलायन केले. यामूळे एकच खळबळ उडाली आहे. सकाळी सहाच्या सुमारास ही घटना पोलिसांच्या निर्दशनास आली. कोल्हापूरसह शेजारील सांगली, रत्नागिरी जिल्ह्यात नाकाबंदी करून पोलिसांची सहा पथके पळालेल्या आरोपीचा शोध घेत आहेत. अशी माहिती पोलिस उपअधिक्षक आर आर .पाटील यांनी दिली. आरोपी कोणाला आढळल्यास त्यांनी पो ना. सराटे -9823527172 आणि पो . शि . मोळके – 9552541554 या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)