कोल्हापूर : लाचप्रकरणी दुय्यम निबंधकासह सहा जेरबंद

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यामधील पन्हाळा इथं दुय्यम निबंधक श्रेणी एक कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून दुय्यम निबंधकासह सहा कर्मचार्‍यांना अटक केली. यात तीन शासकीय सेवक, तर तीन खासगी कर्मचार्‍यांचा समावेश आहे. दुय्यम निबंधक यशवंत चव्हाण, लिपिक  गौरी बोटे, शिपाई प्रकाश सणगर, डाटा ऑपरेटर नितीन काटकर, सुशांत वणिरे व शहाजी पाटील यांचा अटक केलेल्यांमध्ये समावेश आहे.

या कारवाईमुळे जिल्ह्यातील सरकारी कार्यालयांमध्ये खळबळ उडाली आहे. पन्हाळ्यात लाचलुचपत विभागाने एकाच धाडीत एकाच कार्यालयातील सहा जणाना रंगेहाथ पकडण्याचा हा बहुधा  पहिलाच प्रकार आहे. या कारवाईमुळे बरेच दिवस चर्चेत असणार्‍या निबंधक कार्यालयातील लाचखोरी चव्हाट्यावर आली आहे.

पन्हाळा तालुक्यातील बांदिवडे इथले अभिमन्यू पाटील हे कणेरी येथील तानाजी रामू जानकर यांची गट नंबर 534 मधील चार गुंठे शेत जमीन खरेदी करणार होते. खरेदी खत करण्यासाठी आवश्यक  खर्चाची चौकशी करण्यास पन्हाळा दुय्यम निबंधक कार्यालयात निबंधक यशवंत चव्हाण यांना मंगळवारी पाटील हे भेटण्यास गेले. चव्हाण याने दस्त करण्यास अडचण असल्याचे सांगून 1500 रुपयांची मागणी केली. तसेच लिपिक, शिपाई, डाटा ऑपरेटर यांना भेटून ते काय मागतात ते त्यांना द्या, असे सुचवले.

त्यानुसार अभिमन्यू पाटील हे सर्वांना भेटले. सर्वांनी मिळून पाच हजार रुपयांची मागणी केली.  तडजोडीनंतर साडेतीन हजार रुपये द्यायचे ठरले. त्यानंतर पाटील यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कोल्हापूर कार्यालयात भेटून तक्रार दाखल केली. लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाने पोलिस निरीक्षक प्रविण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचला आणि  दुय्मम निबंधक यशवंत सदाशिव चव्हाण  यास दीड हजार रुपये, तर लिपिक  गीता पांडुरंग बोटे,  शिपाई प्रकाश यशवंत सणगर , डाटा ऑपरेटर नितीन  कोंडिबा काटकर , सुशांत दत्तात्रय वणिरे  आणि खासगी उमेदवार शहाजी बळवंत पाटील या पाच जणांना लाच स्वीकारताना अटक केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)