कोल्हापूर महापालिकेला 56 कचराकुंडयाचं वाटप

आमदार सतेज (बंटी) डी.पाटील व प्रतिमा सतेज पाटील सोशल वेलफेलरचा उपक्रम

कोल्हापूर – आमदार सतेज (बंटी) डी. पाटील व प्रतिमा सतेज पाटील सोशल वेलफेअर यांच्या संयुक्त विद्यमाने क्लिन कोल्हापूर या मोहिमेअंतर्गत आज प्रतिमा सतेज पाटील यांनी महापालिकेस 56 कचरा कुंडया प्रदान केल्या. महापालिकेच्यावतीने महापौर स्वाती यवलुजे, आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी व पदाधिकारी यांनी या कचरा कुंडयाचा स्विकार केला. महापालिकेच्या विठ्ठल रामजी शिंदे चौकात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदरच्या कचरा कुंडया शहरातील मुख्य 50 चौकामध्ये बसविण्यात येणार आहेत.

यावेळी प्रतिमा पाटील यांनी बोलताना म्हंटले की  स्वच्छता ठेवणे ही फक्त महापालिकेचीच जबाबदारी नसून,आपली देखील जबाबदारी आहे. आपण सर्वानी मिळून आपलं शहर स्वच्छ ठेवले पाहिजे. असे सांगून त्यांनी आपल्या सोशल वेलफेअरच्या माध्यमातून क्लीन कोल्हापूरसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच नागरिकांनी कचरा इतरत्र कोठेही न टाकता या कचरा कुंडयांचा वापर करावा, व आपले कोल्हापूर क्लीन कोल्हापूर करण्यास  सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)