कोल्हापूर महापालिकेला सुप्रीम कोर्टाचा दणका

जातवैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने 19 नगरसेवकांचे पद रद्द
कोल्हापूर – निवडणुकीत विजयी झाल्यानंतर विहित वेळेत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या 19 नगरसेवकांना सुप्रीम कोर्टाने चांगलाच दणका दिला आहे. कोल्हापूर महानगरपालिकेत असणाऱ्या सर्वपक्षीय 19 नगरसेवकांना आपले नगरसेवक पद गमवावे लागले आहे.

सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे कोल्हापूर महानगरपालिकेत एकच खळबळ उडाली आहे. पद रद्द करण्यात आलेल्या नगरसेवकांमध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, ताराराणी आघाडी आणि शिवसेनेच्या एका नगरसेवकाचा समावेश आहे. दरम्यान , नगरसेवकांत निकालाबाबत संभ्रम आहे. सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली आहे, याचा अर्थ नगरसेवक पद रद्द झाले असा होत नाही. कारवाईचा निर्णय राज्य सरकारने घ्यायचा आहे. एकतर्फी कारवाई होऊ नये म्हणून याचिका दाखल झाली होती असा दावा केला जात आहे.

शासन आदेशानुसार निवडून आल्यानंतर विहित वेळेत जात प्रमाणपत्र सादर न केलेल्यांमध्ये अश्विनी रामाणे ,शमा मुल्ला, वृषाली कदम यांच्यासह सुभाष बुचडे, संदीप नेजदार, स्वाती यवलुजे, कमलाकर भोपळे, अफजल पिरजादे, किरण शिराळे, हसीना फरास, सचिन पाटील, संतोष गायकवाड, अश्विनी बारामते, सविता घोरपडे, विजयसिंह खाडे-पाटील, दीपा मगदूम, रिना कांबळे, मनीषा कुंभार, नियाज खान या नगरसेवकांचा समावेश आहे

कोल्हापूर महानगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक सन 2015- 2016 मध्ये झाली होती. या निवडणुकीमध्ये कॉंग्रेसचे -27 राष्ट्रवादीचे -15 भाजपचे- 13, ताराराणी आघाडीचे -19 ,शिवसेनेचे-4 आणि अन्य 2 नगरसेवक निवडून आले आहेत. महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी करत महापौर आणि उपमहापौर पदावरती आपला दावा सांगितला यावेळी कॉंग्रेसचे नेते आमदार सतीश पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी ठरवलेल्या सूत्रानुसार सहा महिने महापौरपद राष्ट्रवादीकडे आणि सहा महिने उपमहापौरपद हे कॉंग्रेसकडे पुढील सहा महिन्यात उपमहापौरपद राष्ट्रवादीकडे आणि महापौर पद हे कॉंग्रेसकडे अशा पद्धतीची वाटाघाटी झाल्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेत हा फॉर्म्युला राबवला गेला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)