कोल्हापूर : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुणवंतांचा सत्कार

कोल्हापूर –  महानगरपालिकेच्या वतीने आज झालेल्या सर्वसाधारण सभेत महापौर स्वाती यवलुजे यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील गुणीजनांचा सत्कार करण्यात आला.यामध्ये कोल्हापूरची सुवर्णकन्या तेजस्विनी सावंतचा सत्कार महापौर स्वाती यवलुजे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व रोप देवून करण्यात आला. तेजस्विनीच्या वतीने हा सत्कार  बहीण अनुराधा पित्रे यांनी स्विकारला.

तसेच किशोरी पसारेची  शिवाजी विद्यापीठाच्या विदयार्थी मंडळाच्या अध्यक्षपदी व अधिसभा सदस्यपदी निवड झालेबद्दल), कु.संग्राम देवणे (सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक पदावर निवड झालेबद्दल), विजय साळोखे (फुटबॉल सामन्यावेळी उत्कृष्ट समालोचन करुन स्पर्धेत उत्साह निर्माण करतात त्यांच्या या कार्याबद्दल), कु.मयुरेश राम पै (दिव्यांगाच्या खेलो इंडिया स्पेशल ऑल्मपिंक राज्यस्तरीय क्रिडा प्रकारात 100 मीटर मध्ये रौप्य पदक व गोळाफेकमध्ये कास्य पदक पटकाविल्याबद्दल), कु.साईराज दत्तात्रय कचरे (अमरावती येथे झालेल्या राज्यस्तरीय पोहण्याच्या स्पर्धेत 100 मी ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात दुसरा क्रमांक पटकाविल्याबद्दल), कु.कोमल कुंदन भिसे (मायक्रो बायोलॉजी पी.एच.डी. पदवी प्राप्त केल्याबद्दल), कु.नविन मुरलीधर राऊत (लंडन येथील विद्यापीठात उच्च शिक्षणाकरिता भारत सरकारची शिष्यवृत्ती मिळविल्याबद्दल)

-Ads-

कु.स्नेहा सुरेश राऊत (नेपाळ येथे होणाऱ्या कराटे स्पर्धेकरिता निवड झालेबद्दल), सौ.काचंन सुभाष अंगडी (महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालकल्याण समिती, कोल्हापूर जिल्हा सदस्यपदी निवड झालेबद्दल) तसेच महापालिकेच्या रा.शाहू स्पर्धा परिक्षा अभ्यास केंद्राकडील उत्तीर्ण झालेल्या ऋतुजा पाटील (आर.टी.ओ. मोटर व्हेईकल इन्स्पेक्टर), निलम पाटील, गायत्री शिपेकर, तानाजी कोईगडे (मुंबई मंत्रालय लिपीक पदी निवड), अमित पाटील, उमेश कुंभार, दिगंबर बा. पाटील, दिगंबर भा. पाटील (महाराष्ट्र राज्य परिवहन विभागात लिपीकपदी निवड) यांचा महापौर सौ.स्वाती यवलुजे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व रोप देवून सत्कार करण्यात आला.

यावेळी आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी, उपमहापौर सुनिल पाटील, स्थायी समिती सभापती आशिष ढवळे, परिवहन समिती सभापती राहूल चव्हाण, प्राथमिक शिक्षण समिती सभापती सौ.वनिता देठे, महिला बालकल्याण समिती सभापती सुरेखा शहा, सभागृहनेता दिलीप पोवार, विरोधी पक्षनेता विलास वास्कर, प्रभाग समिती सभापती सौ.प्रतिक्षा पाटील, अफजल पिरजादे, सौ.छाया पोवार, गटनेता शारंगधर देशमुख, सत्यजित कदम, विजय सुर्यवंशी, नियाज खान, नगरसेवक, नगरसेविका व अधिकारी उपस्थित होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)