कोल्हापूर मनपात गदारोळात रस्ते हस्तांतरणाचा ठराव मंजूर

– दारु दुकानांना अभय

– विरोधकांनी केला महापौरांचा मानदंड पळविण्याचा प्रयत्न

कोल्हापूर, दि. 20 (प्रतिनिधी) – कोल्हापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज सत्ताधारी-विरोधकांमध्ये झालेली धक्काबुक्की, बाचाबाची आणि प्रचंड गदारोळात अखेर रस्ते हस्तांतरणाचा प्रस्ताव मंजूर झाला. आज (सोमवार) महासभेत रस्ते हस्तांतरणाचा मुद्दा प्रचंड गाजला. सत्ताधारी-विरोधकांत बाचाबाची होऊन हाणामारीसाठी एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. विरोधकांनी महापौरांचा मानदंड पळविण्याचा प्रयत्न केला. या सर्व गदारोळाच्या दरम्यान हा प्रस्ताव विरुद्ध मतांनी मंजूर करण्यात आला. यामुळं सभागृहात तणाव निर्माण झाला होता.

कोल्हापूर महापालिकेचे आजची सभा म्हणजे जणू आखाडाच बनली. कोण नगरसेवक घोषणाबाजी करत एकमेकांच्या अंगावर धावून जातोय. तर कोणी मानदंड पळवतोय… याच गोंधळात कोल्हापूर महानगरपालिकमध्ये अखेर रस्ते हस्तांतरणाचा ठराव मंजूर करण्यात आला. प्रचंड गोंधळात आणि घोषणाबाजी करत 47 विरुद्ध 32 मतांनी ठराव मंजूर झाला. कोल्हापूर शहरातील राज्य मार्ग असलेले चार रस्ते महापालिकेकडे हस्तांतरित करावे म्हणून सत्ताधारी कॉंग्रेस-राष्ट्रवादीने आजच्या सर्वसाधारण सभेत ठराव दाखल केला होता. त्यास विरोधी भाजप-ताराराणी आघाडीने विरोध करून हा ठराव हाणून पाडण्याचे प्रयत्न केले. मात्र, संख्याबळाच्या जोरावर कॉंग्रेस,राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीकडून ठराव मंजूर करण्यात आला. आजच्या सभेत ताराराणी आघाडीचे नगरसेवक विलास वास्कर यांनी महापौरांच्या टेबल वरील मानदंड पाळवूं नेण्याचा प्रयत्न केला. या प्रकरामुळं सभागृत सर्व नगरसेवक एकमेकांच्या कडे पाहत जोरदार घोषणाबाजी करत होते. यामुळं सभागृहात आणखी गोंधळ उडाला. मानदंड पळवून नेण्याच्या प्रकारावर महापौरांनी नाराजी व्यक्त केलीय. याच दरम्यान कॉंग्रेसचे गटनेते शांगरधर देशमुख आणि भाजपा नगरसेवक यांच्यातील शाब्दिक वाद वाढत गेल्याने अन्गावर धावून जात धक्का बुक्कीचा प्रकार घडला. या सम्पुर्ण गोंधळात कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ताधारी नागसेवकांनी हात उंच करून मतदान घेत उपसूचना नामंजूर करत 47 विरुद्ध 32 मतांनी ठराव मंजूर झाला. विशेष म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या महिलांनि देखील रस्ते हस्तानंतरण करण्याच्या बाजूने मतदान केले.

आज सकाळी साडेअकराच्या सुमारास महापालिकेची सभा सदस्यांची वादावादी, हमरीतुमरी आणि एकमेकाच्या अंगावर धावून जाण्यामुळे तणावपूर्ण वातावरणात झाली. विरोधक आणि सत्ताधारी सदस्यांनी एकमेकांवर लिकर लॉबीकडून पैसे घेतल्याचा आरोप केला. भाजपचे नगरसेवक कमलाकर भोपळे आणि कॉंग्रेसचे नगरसेवक शारंगधर देशमुख हे एकमेकांच्या अंगावर धावून गेले. या प्रकारामुळे महापौरांनी अर्धा तास सभा तहकूब केली. तसंच महापौर हसीना फरास सभेतून उठून गेल्या. त्यानंतर तासाने सभा पुन्हा सुरू झाली, मात्र सदस्यांनी पुन्हा गोंधळ घातला.

महापौरांनी जेव्हा रस्ते हस्तांतरणासाठी होणा-या विरोधामुळे मतदानाने प्रस्ताव मंजूर करावा म्हणताच विरोधक आक्रमक झाले. आक्रमक झालेल्या विरोधी गटातील विलास वास्कर, संतोष गायकवाड आणि किरण नकाते यांनी मानदंड पळवण्याचा प्रयत्न केला. यावर महापौर संतापल्या. या सर्व गदारोळातच प्रस्तावासाठी मतदान घेण्यात आले. सत्ताधा-यांचे मते तर विरोधकांचे मते झाल्याने सत्ताधा-यांनी आणलेला हा ठराव मंजूर झाल्याचे जाहीर होताच भाजप आणि ताराराणी आघाडीच्या नेत्यांनी सभात्याग केला. या प्रस्तावला मत देणे म्हणजे दारू दुकानांच्या बाजूने मते, असा आरोप यावेळी विरोधी पक्षनेते सत्यजित कदम यांनी केला.

रस्ते हस्तांतरणामुळे त्या भागातील नागरिकांना त्याच्या त्रास होणार आहे. तसेच आहेत ते रस्ते दुरुस्त करण्यासाठी पालिकेकडे निधी नाही मग आणखी रस्ते हवेत कशाला, असा प्रश्न यावेळी निर्माण करण्यात आला. तसेच सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाविरुद्ध हा प्रस्ताव मान्य करणे म्हणजे त्या आदेशाचा अवमान आहे, असे भाजपचे गटनेता विजय सूर्यवंशी यांनी या वेळी सभागृहाला सांगितले. सत्ताधाऱ्यांनी संख्याबळाच्या आधारे हा प्रस्ताव मंजूर करून घेतल्याचा आरोप सत्यजित कदम यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)