कोल्हापूर मनपाच्या प्राथमिक शिक्षण समितीच्या सभापतीपदी वनिता देठे

कोल्हापूर – कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीचे सभापतीपदी वनिता देठे व उपसभापतीपदी प्रतिक्षा पाटील यांची निवड आज महापालिकेच्या छ. ताराराणी सभागृहात आयोजीत विशेष बैठकीत करण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.

कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समिती सभापतीपदासाठी नगरसेविका वनिता देठे व नगरसेविका सविता घोरपडे यांचे अर्ज दाखल झाले होते. प्रारंभी सभा अध्यक्षांनी दोन्ही उमेदवारांच्या अर्जांची छाननी करुन दोन्ही अर्ज वैध असल्याचे जाहिर केले. त्यानंतर माघारीसाठी 15 मिनिटे वेळ देण्यात आली. यामध्ये कोणीही अर्ज मागे घेतला नाही.
यानंतर प्राथमिक शिक्षण समिती सभापतीपदी दोन उमेदवार राहिलेने हात वर करुन मतदान घेण्यात आले. यामध्ये वनिता देठे यांना 5 मते तर सविता घोरपडे यांना 4 मते पडली. वनिता देठे यांना सर्वाधिक 5 मते पडल्याने त्यांची प्राथमिक शिक्षण समितीच्या सभापतीपदी निवड झाल्याचे पीठासन अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घोषित केले.

नुतन प्राथमिक शिक्षण समिती सभापती या प्रभाग क्र.80 कणेरकरनगर-क्रांतिसिंह नाना पाटीलनगर या मतदार संघातून नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. प्राथमिक शिक्षण समिती उपसभापती पदासाठी नगरसेविका प्रतिक्षा पाटील व भाग्यश्री शेटके यांचे अर्ज दाखल झाले होते. उपसभापतीपदी हात वर करुन मतदान घेण्यात आले. यामध्ये प्रतिक्षा पाटील यांना 5 मते तर भाग्यश्री शेटके यांना 4 मते पडली. पीठासन अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणार खेमणार व महापौर हसिना फरास यांनी नुतन प्राथमिक शिक्षण समिती सभापती, उपसभापती यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

यावेळी पीठासन अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कुणार खेमणार, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, सहाय्यक आयुक्त मंगेश शिंदे, प्रशासन अधिकारी प्रतिभा सुर्वे, अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक संजय भोसले, नगरसचिव दिवाकर कारंडे, कामगार अधिकारी उमाकांत कांबळे, आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)