कोल्हापूर – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात महाराणी ताराबाई सभागृहात जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर, करवीरचे प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसिलदार गणेश शिंदे, सविता लष्करे, नायब तहसिलदार अपर्णा मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडंकरांची जयंती ही लोकोत्सव म्हणून साजरी करण्यात यावी. आजचा दिवस हा अभिमानाचा दिवस असून समाजात एकता, अखंडता आणि बंधुभाव अबाधित राहण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य आणि विचार आचरणात आणणे आवश्यक आहे. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर आधारीत चित्रफित दाखवण्यात आली. नायब तहसिलदार प्रकाश दगडे यांनी संविधानाचे वाचन केले व आभार मानले. याप्रसंगी महसूल अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा