कोल्हापूर-बीदर एक्‍सप्रेस आजपासून धावणार

कोल्हापूर – कोल्हापूर ते बीदर ही नवी साप्ताहीक एक्‍सप्रेस बुधवारी (दि. 13) सुरु होत आहे. पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मिलींद देऊस्कर हे कोल्हापूर स्थानकात रात्री एक्‍सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. मिरजेतही प्रवासी संघटना तिचे स्वागत करणार आहेत.

वीस डब्यांची ही गाडी (11415) प्रत्येक बुधवारी रात्री 11.35 वाजता कोल्हापुरातून सुटेल. दुसऱ्या दिवशी (गुरुवारी) सकाळी 10.15 वाजता बीदरमध्ये पोहोचेल. दिड तासांच्या विश्रांतीनंतर दुपारी पावणेबारा वाजता परत कोल्हापूरसाठी (क्रमांक 11416) सुटेल, रात्री 12.35 वाजता कोल्हापुरात पोहोचेल. या गाडीला भालकी, उदगीर, लातूर रोड, लातूर, उस्मानाबाद, कुर्डुवाडी, पंढरपूर आणि मिरज हे थांबे आहेत.

नऊ स्लिपर, तीन वातानुकुलीत, सहा जनरल डब्यांचा समावेश आहे. कोल्हापूर-नागपूर ही एक्‍सप्रेस कोल्हापुरात चार दिवस थांबून असते, या काळात ती कोल्हापूर-बीदर एक्‍सप्रेस म्हणून धावेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)