कोल्हापूर बाल राज्य नाट्य स्पर्धचे उद्‌घाटन

कोल्हापूर – लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी अशा बाल नाट्य स्पर्धांची खऱ्या अर्थाने गरज आहे. या स्पर्धेत बाल मित्रांनी मोठया संख्येने सहभागी होऊन कलेचा आनंद घ्यावा, असे आवाहन महापौर सरिता मोरे यांनी शुक्रवारी केले. केशवराव भोसले नाट्यगृहात शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयातर्फे 16 व्या बाल राज्य नाट्य स्पर्धेच्या उद्‌घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी महापौर यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने स्पर्धेचे उद्‌घाटन करण्यात आले.

या स्पर्धा 11 जानेवारीपर्यंत सुरु राहणार आहेत. यावेळी अखिल भारतीय नाट्य परिषद कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष मनोहर कुईगडे प्रमुख उपस्थित होते. आजच्या स्पर्धेची सुरुवात एस. पी. शिसोदे लिखित “पाऊल पडते पुढे’ या नाटकाने झाली. आदर्श गुरुकुल विद्यालय हातकणंगलेच्या कलाकारांनी हे नाटक सादर केले. यानंतर व्ही. ए. पोतदार आजरा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी “तप्त दाही दिशा’, तर आण्णाभाऊ इंग्लिश स्कूल आजरा येथील विद्यार्थ्यांनी “एक घर एकविसाव्या शतकातील’ नाटक सादर करुन रसिकांना तृप्त केले. बाल कलाकारांच्या अविष्काराला रसिकांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)