कोल्हापूर पुजारी हटाव मोहिमेत आता भूमाता ब्रिग्रेड उतरणार- तृप्ती देसाई

कोल्हापूर, दि. 20 (प्रतिनिधी) – शहरात करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील पुजारी हटाव आंदोलन तापले आहे. त्यातच या आता भूमाता ब्रिगेड सहभागी होणार आहे. भूमाता ब्रिग्रेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी कोल्हापुरात ही माहिती दिली.

गेल्या 15 दिवसांपासून अंबाबाई मंदिरात श्री पूजक आणि हिंदुत्ववादी यांच्यात जोरदार वाद सुरू आहे. या वादावर अद्याप तोडगा निघालेला नसताना या वादात भूमाता ब्रिगेडची उडी घेतली आहे. या पूर्वी अंबाबाई मंदिरातील गाभाऱ्यात प्रवेश करण्यावरून तृप्ती देसाई यांना पुजाऱ्याकडून धक्काबुक्की झाली होती. त्या पार्श्वभूमीवर आता देसाई आता आक्रमक झाल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)