कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस

संग्रहित छायाचित्र

अणूस्कुरा घाटात दरड कोसळली;


शाहूवाडी, राधानगरी, चंदगडसह गगनबावडा तालुक्‍यांत अतिवृष्टी


सात गावांचा संपर्क तुटला; जिल्ह्यात 17 घरांची पडझड

कोल्हापूर – गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असल्याने पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. या मुसळधार पावसामुळे 49 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. झांबरे धरणातून विसर्ग वाढवल्याने चंदगड-तिलारी-गोवा मार्ग ठप्प झाले आहेत.

झांबरे धरणातून विसर्ग वाढल्याने चंदगड तालुक्‍यातील 7 गावांचा संपर्क तुटला आहे. मुसळधार पावसामुळे अणूस्कुरा घाटात मोठ्या प्रमाणावर दरड कोसळली आहे.

राधानगरी, दूधगंगा, तुळशी, वारणासह जिल्ह्यातील इतर सर्व धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात आज शाहूवाडी, चंदगडसह गगनबावडा तालुक्‍यांत अतिवृष्टी झाली. धरणक्षेत्रातील धुवाधार पावसाने विसर्ग वाढला असून, नद्यांची पाणीपातळी चांगलीच वाढली आहे. आजरा, चंदगड, शाहूवाडी आणि भुदरगड तालुक्‍यात 17 घरांची पडझड झाली असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील 5 राज्यमार्गासह 11 जिल्हा मार्गावर पाणी आले असून पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु आहे.

मुसळधार पावसामुळे बुधवारी रात्री अकराच्या दरम्यान राजापूर तालुक्‍यातील पूर्व परिसरातील अणुस्कुरा घाटात दरड कोसळल्याने कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. गुरुवारी सकाळपासून दरड घटविण्याचे काम सुरु होते. अणुस्कुरामार्गे जाणारी वाहतूक अन्यमार्गे वळविण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)