#कोल्हापूर: जिल्ह्यात कुष्ठरोग शोध अभियान 24 सप्टेंबरपासून राबविण्यात येणार

अभियानासाठी 2 हजार 654 पथके स्थापन- निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे
तपासणीसाठी 33 लाखावर लोकसंख्येची 7 लाख 59 हजार 162 घरांची निवड
कोल्हापूर : जिल्ह्यात कुष्ठरोग शोध अभियान 24 सप्टेंबरपासून राबविण्यात येणार असून यासाठी 2 हजार 654 पथके स्थापित करण्यात आली असल्याची माहिती निवाजिल्ह्यात 24 सप्टेंबरपासून कुष्ठरोग शोध अभियानसी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिली.
राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाची जिल्हा समन्वय समितीची सभा शाहुजी सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. योगेश साळे, कुष्ठरोगचे सहाय्यक संचालक डॉ. प्रकाश पाटील, कृषि विकास अधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, जिल्हा परिषद सदस्य सुभाष सातपुते, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद मोरे, एनआरएचएमच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. स्मिता खंडारे, राजन आपुगडे, उपशिक्षण अधिकारी सौ.जे.एन. जाधव, कुष्ठपिडीत संघटनेच्या माया रनवरे आदीजण उपस्थित होते.
जिल्ह्यात कुष्ठरोग शोध अभियान दिनांक 24 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर 2018 या कालावधीत राबविण्यात येणार असून यामध्ये आजपर्यंत निदर्शनास न आलेले कुष्ठरोग लवकरात लवकर व विनाविकृती शोधून काढून त्यांना बहुविध औषधोपचाराखाली आणण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. नवीन सांसर्गिक कुष्ठरूग्ण शोधून बहुविध औषधोपचाराखाली आणून संसर्गाची साखळी खंडीत होऊन रोगाचा होणारा प्रसार कमी करणे. कुष्ठरोग दुरीकरणाचे ध्येय साध्य करून कुष्ठरोग निर्मुलनाच्या दिशेने वाटचाल करणे. कुष्ठरोग दुरीकरणाचे ध्येय साध्य करुन कुष्ठरोग निर्मुलनाच्या दिशेने वाटचाल करणे, हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमाचा समावेश पंतप्रधान प्रगती योजनेतंर्गत केला असून या अभियानांतर्गत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 100 टक्के लोकसंख्येची तर नागरी भागातील 1/3 लोकसंख्येची कुष्ठरोगाविषयी शारीरीक तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीसाठी आवश्यक आणि प्रशिक्षित आरोग्य टिम तयार करण्यात येणार आहे. जिल्ह्यात या अभियानांतर्गत तपासणीसाठी 33 लाख 89 हजार 694 लोकसंख्येची 7 लाख 59 हजार 162 घरे निवडण्यात आली आहेत. या लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यासाठी 2654 पथके स्थापन केली असून सर्वेक्षणामध्ये सुसुत्रता आणण्यासाठी व पर्यवेक्षणासाठी 530 पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्ह्यात कुष्ठरोग शोध अभियान यशस्वी करण्यासाठी तसेच समाजातील कुष्ठरोगाबाबतची भीती दूर करून कुष्ठरोगाची संशयीत लक्षणे आढळून आल्यास स्वत:हून तपासणीसाठी पुढे येण्याची प्रवृत्ती वाढीस लागावी या उद्देशाने कुष्ठरोग निर्मुलनासाठी ही मोहिम यशस्वी करण्यासाठी सर्वानी सक्रीय योगदान द्यावे असे त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीस या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी अशी चर्चा करण्यात आली.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)