कोल्हापूर जिल्हा हागणदारीमुक्त – अविनाश सुभेदार

कोल्हापूर – केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात गेत्या तीन वर्षात स्वच्छतेची भरीव कामे  झाली असून, या अभियानातून कोल्हापूर जिल्हा हागणदारीमुक्त झाला आहे. यापुढे शहरी भागात घनकचरा निर्मुलन आणि सांडपाणी व्यवस्थापनाला प्राध्यान्य देण्यात येणार असल्याचं  जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी सांगितले.

भारत सरकारच्या पत्र सूचना कार्यालयाच्यावतीने आणि कोल्हापूर विभागीय व जिल्हा माहिती कार्यालयाच्या सहकार्याने येथील मराठा रिजन्सीच्या सभागृहात आयोजित केलेल्या वार्तालाप माध्यम कार्यशाळेचा शुभारंभ जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आला. याप्रसंगी आयोजित समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमाला सर्व प्रमुख दैनिकांमधील संपादक उपस्थित होते.

केंद्र शासनाच्या प्राधान्य क्रमाच्या विविध विकास व कल्याणकारी योजनांची जिल्ह्यात प्रभावी आणि परिणामकारक अंमलबजावणी करण्यात येत असलयाचे सांगून जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार म्हणाले, स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण भागात भरीव काम झाले असून कोल्हापूर महानगरपालिकेसह आठ नगरपालिका आणि संपूर्ण जिल्हा हागणदारीमुक्त झाला आहे. हागणदारीमुक्तीची ही मोहिम जिल्ह्यात यापुढेही सातत्यपूर्ण राबविली जाईल. स्वच्छ भारत अभियानाच्या यापुढील टप्यात शहरातील घनकचरा निर्मुलन आणि सांडपाणी व्यवस्थापनाचा प्रभावी कार्यक्रम जिल्ह्यात हाती घेण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत नगरपालिका क्षेत्रात ओला आणि सुका कचरा साठविण्याची व विलगिकरणाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येत आहे. कागल नगरपालिकेने घनकचऱ्यापासून वीज निर्मितीचा महत्वकांक्षी उपक्रम यशस्वी करुन दाखविला आहे.

पत्र सूचना कार्यालय मुंबईचे सहाय्यक संचालक नितीन सप्रे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.  ते म्हणाले, पत्र सूचना कार्यालयाच्यावतीने आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमाद्वारे केंद्र सरकारच्या विविध विकास व कल्याणकारी योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच पत्र सूचना कार्यालय आणि प्रसार माध्यमांचा परस्पर संवाद वाढावा यासाठी सकारात्मक प्रयत्न केले जात आहेत. जिल्ह्या जिल्ह्यातून या उपक्रमासाठी मिळालेल्या उत्स्‍फूर्त प्रतिसादाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. समारंभास मान्यवर वक्ते तसेच शहर व जिल्ह्यातील वृत्तपत्रांचे संपादक, प्रतिनिधी, इलेक्ट्रॉनिक मिडियांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)