कोल्हापूर जिल्हा परिषदेचा ३८ कोटींचा अर्थसंकल्प सादर  

कोल्हापूर –  गर्भसंस्कारापासून ते लॅपटॉप वितरणापर्यंतचा आणि पुस्तकांपासून ते मोफत सॅनिटरी नॅपकीन पुरवण्याच्या विविध योजनांचा समावेश असलेला कोल्हापूर जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प गुरूवारी सादर करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक होत्या.

अर्थ समितीचे सभापती अंबरिष घाटगे यांनी राजर्षि शाहू सभागृहामध्ये हा ३८ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला असून यातून प्रत्येक सदस्याला ६ लाख रूपयांचा स्वनिधी देण्याची घोषणा करण्यात आली आहे. बहुतांशी सदस्यांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत केले असून काही बाबींवरची तरतूद वाढवण्याची मागणी केली आहे. अनेक नाविन्यपूर्ण योजनांचा समावेश हे या अर्थसंकल्पाचे मोठे वैशिष्ट्य ठरलेआहे.

सभेच्या सुरुवातीला सदस्य प्रा. शिवाजी मोरे यांनी या अर्थसंकल्पाचे अभ्यासपूर्ण विश्लेषण करून जिल्हा परिषदेच्या मालमत्ता विकसित करण्यासाठी निधी वाढवण्याची मागणी केली. सौरउर्जेवरच्या साधनांची योजना आवश्यक असल्याचे ते म्हणाले. अ‍ॅड. हेमंत कोलेकर यांनी भजनी मंडळाना साहित्य देण्याची तर राहूल आवाडे यांनी वडगाव, हुपरी नगरपरिषद गोळा करणारा शिक्षण कर जिल्हा परिषदेकडे घेण्याची मागणी केली.

वंदना जाधव यांनी शोष खडड्यावरील निधी तर प्रविण यादव यांनी शिवा काशिद स्मारकावरील निधी वाढवण्याची मागणी केली. सेंद्रीय शेतीवर निधीची मागणी हंबीरराव पाटील यांनी तर राजवर्धन निंबाळकर यांनी लॅपटॉपची मागणी केली. सतीश पाटील यांनी अखर्चित निधीबाबत विचारणा केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)