कोल्हापूर : जिल्हयात पुरेसा पाणीसाठा – चंद्रकांत पाटील

कोल्हापूर  – कोल्हापूर जिल्हयात पुरेसा पाणीसाठा असून गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा चांगला आहे. चिकोत्रा आणि चित्री या दोन ठिकाणी पिण्यासाठी पाणी शिल्क ठेवल्यानंतर शेतीसाठी दोन आवर्तने देता येतील. मे पुर्वी जिल्हयात तलावांचे व विहिरीचे गाळ काढणे, इंधन  विहिरीची कामे करणे आदी 339 कामे करण्यात येणार असून त्यासाठी 2 कोटी 32 लाखाचा निधी खर्च करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

कोल्हापूर जिल्हयातील सन 2017-18 मध्ये पाणी टंचाईबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार हसन मुश्रीफ, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, आमदार उल्हास पाटील, आमदार संध्यादेवी कुपेकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता एस.आर.पाटील, किरण पाटील, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता एस.एस.पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

कोल्हापूर जिल्हयातील सर्व धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्याचे सांगून टंचाई जाणवून काही ठिकाणी टँकरची मागणी आल्यास तहसिलदारांनी एका दिवसात पुर्तता करावी असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी  दिले.  याबरोबरच लोकप्रतिनिधींनी त्यांच्या मतदार संघातील टंचाई जाणवणाऱ्या गावांची यादीही प्रशासनाकडे द्यावी असे सांगितले. जलयुक्त शिवार योजनेमध्ये समाविष्ठ न होवू शकलेल्या पण कामांची आवश्यकता असलेल्या गावांमध्ये जलयुक्तची कामे करण्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे सांगून गावांनी लोकवर्गणीसह प्रस्ताव तयार करावेत, असेही  पालकमंत्री पाटील यावेळी म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)