कोल्हापूर: भारतीय जनता पार्टीचे आमदार राम कदम यांनी काल मुंबईत मुलींबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ आज कोल्हापुरातील काँग्रेसच्या महिला आघाडीच्यावतीने जोरदार निषेध नोंदवण्यात आला. आमदार राम कदम यांच्या पुतळ्याला चपला मारो आंदोलन करत त्यांचा पुतळा जाळण्यात आला.
भाजपाचे आमदार राम कदम यांनी काल घाटकोपर इथल्या एका कार्यक्रमात मुलींबद्दल अपशब्द काढल्या मुळे ते चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यांच्या या विधानाच्या विरोधात राज्यात ठिकठिकाणी निषेध नोंदवण्यात येत आहे. आज कोल्हापुरातील कॉंग्रेसच्या महिला आघाडीच्या वतीने राम कदम यांच्याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात आले.  कोल्हापुरातील दाभोळकर कॉर्नर परिसरात राम कदम यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या पुतळ्याला जोड्यांचा प्रसाद देण्यात आला. तसेच संतप्त कार्यकर्त्यांनी राम कदम यांच्या पुतळ्याचं दहन केलं.
यापुढे आमदार राम कदम जर कोल्हापुरात आले तर त्यांना महिलांच्या वतीने चपलांचा हार घालण्यात येईल असा इशाराही महिला कार्यकर्त्यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)