कोल्हापूर : ऐतिहासिक कात्यायनी मंदिरात चोरी

कोल्हापूर – कोल्हापूरच्या ऐतिहासिक कात्यायनी देवी मंदिरात चोरी झाल्याचे पहाटे निष्पन्न झाले. मंदिराचे लाकडी दरवाजे तोडून चोरट्यांनी देवीचे दोन मुकुट, पंचारती असे सुमारे दोन किलो वजनाचे चांदीचे दागिने लंपास केले.
कात्यायनी देवी मंदिराला पुरातन महत्व आहे. बलिंगा येथील रामचंद्र विष्णू गुरव हे मंदिराचे पुजारी आहेत.

मंदिर परिसरातच ते कुटुंबासह राहतात. आज पहाटे नेहमी प्रमाणे ते मंदिरात पूजेसाठी आले असता मंदिरातील लोखंडी दरवाजा तुटलेला दिसला. त्यांनी आत जाऊन पाहिले असता देवीच्या गाभाऱ्यातील संस्थान कालीन चांदीचे दोन मुकुट, पंचारती असा ऐवज लंपास झाला होता. त्यांनी मंदिरा बाहेर येऊन पाहिले असता मंदिराच्या दर्शन मंडपात असलेले छोटे लाकडी दरवाजे व लोखंडी कपाट उचकटले होते.

चोरीचा प्रकार लक्षात येताच गुरव यांनी याची माहिती पोलीसांना दिली. घटनेबाबत समजताच करवीर पोलीस उपधीक्षक सुरज गुरव, पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्यासह गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. चोरट्यांनी मंदिरातील दोन चांदीची ताटे, देणगीची काही रक्कम तसेच पितळेची भांड्याना हात लावलेला नाही शिवाय गाभाऱ्यातील कपाटे कुलपं काढून चोरी झाली आहे. त्यामुळे चोरट्यांचा हेतू काय असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.

घटनास्थळी श्वान पथकाला ही पाचारण करण्यात आले. श्वानाने मंदीराच्या आवरातून मुख्य रस्त्यापर्यतच माग काढला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)