कोल्हापूरात स्वाईन फ्लूचे चार बळी

कोल्हापूर – कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव वाढला असून मंगळवारी रात्री आणखी चौघेजण दगावले आहेत. यात कोल्हापुरातील तिघांचा, तर सांगली जिल्ह्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. श्रीपती शंकर पाटील (वय 60, रा. अकिवाट, ता. शिरोळ), हर्षाली बाळासो शिरगावकर (अडीच वर्षे, रा. जरगनगर), दुंडप्पा सिद्धाप्पा दुंडगे (64, रा. हसूरचंपू, ता. गडहिंग्लज) या तिघांसह सांगली जिल्ह्यातील धनाजी नामदेव पाटील (35, रा. बिऊर, ता. शिराळा) या चौघांचा स्वाईन फ्लूने बळी घेतला आहे.

दरम्यान, स्वाईन फ्लूच्या वाढत्या फैलावामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. महिन्यात सातहून अधिक नागरिकांचे बळी गेले आहेत. श्रीपती पाटील, धनाजी पाटील यांचा मंगळवारी, तर हर्षाली शिरगावकर व दुंडप्पा दुंडगे यांचा सोमवारी मृत्यू झाला. बिऊरच्या धनाजी पाटील यांना 13 रोजी, तर श्रीपती पाटील यांना 20 सप्टेंबर रोजी उपचारासाठी येथील रुग्णालयात दाखल केले होते. त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता त्यांना स्वाईन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)