कोल्हापूरात सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते ताब्यात 

आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांची कारवाई 

कोल्हापूर: मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात उद्या (दि. 26) मुंबईत गाडी मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामध्ये सहभागी होण्यासाठी जाणाऱ्या सकल मराठा समाजाचे कार्यकर्त्यांना आज पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप मराठा आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

वसंतराव मुळीक, दिलीप देसाई, इंद्रजित सावंत आणि हर्षल सुर्वे असे ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांना अज्ञातस्थळी हलविण्यात आले.

सकल मराठा समाजातर्फे सोमवारी (दि. 26) मुंबईत गाडी मोर्चा काढण्यात येणार आहे. यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात अनेक दिवसांपासून जय्यत तयारी सुरू आहे. नियोजनाच्या विविध बैठकाही घेण्यात आल्या. आज दुपारी दसरा चौकात मुंबईला मोर्चाला जाण्याची तयारी वसंतराव मुळीक, दिलीप देसाई, इंद्रजित सावंत, हर्षल सुर्वेसह कार्यकर्ते करत होते. याठिकाणी पोलीस दाखल झाले. त्यांनी त्यांना विनंती करून गाडीत बसवले. त्यानंतर त्यांना पोलीस अधीक्षक कार्यालयात नेण्यात आले. येथे त्यांच्याशी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी चर्चा केली.

यावेळी अपर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, गृह-पोलीस उपअधीक्षक सतिश माने, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक शशिराज पाटोळे, लक्ष्मीपुरीचे पोलीस निरीक्षक वसंत बाबर आदी उपस्थित होते. चर्चेनंतर त्यांना पोलिस व्हॅनमधून अज्ञातस्थळी हलविण्यात आले. त्यावेळी त्यांनी एक-मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या. दरम्यान, सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी दसरा चौक येथील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्या समोर आंदोलन सुरू केले आहे. अटक केलेल्या कार्यकर्यांना सोडत नाहीत तोपर्येत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)