कोल्हापूरात शेतकऱ्यांनी कांदे सौदे बंद पाडले 

व्यापारी, बाजार समिती संगनमताने लूट करत असल्याचा आरोप

कोल्हापूर – शुक्रवारी 1700 ते 1900 क्विंटल असणारा कांदा शनिवारी 700 ते 1100पर्यंत खाली आल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शनिवारी बाजार समितीतील सौदेच बंद पाडले. व्यापारी व बाजार समितीने संगनमत करुन दर पाडले आहेत, असा आरोप करत कांदे घेउन आलेल्या परजिल्ह्यातील विशेषता सोलापुरातील शेतकऱ्यांनी बाजार समिती कार्यालयासमोर निदर्शने करुन ठिय्या मारत रोष व्यक्त केला.

कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत बाहेरील जिल्ह्यातीलच कांदे मोठ्या प्रमाणावर येतात. शनिवारी पुण्याचा बाजार बंद असल्याने कोल्हापुरात येणाऱ्या कांद्याची आवक वाढली. दररोज 70 ते 90 ट्रक येत असताना शनिवारी ही संख्या 110वर गेली. कांद्याची आवक वाढल्याने सौदेही उशिरा सुरु झाले.

-Ads-

साडेअकराच्या सुमारास अशोक मोटूमल यांच्या अडत दुकानी सौदे काढण्यास सुरुवात झाली. सौद्यात उच्च प्रतीच्या एक नंबर कांद्याला किमान 700 ते कमाल 1100 रुपये भाव निघाल्याने उपस्थित कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी जोरदार हरकत घेतली. शुक्रवारी 1700 ते 1900 रुपये प्रतिक्विंटल असणारा भाव अचानक एका दिवसात 700 ते 1100 कसा झाला याबद्दल व्यापाऱ्यांना जाब विचारण्यास सुरुवात केली. वाद वाढल्याने सर्व शेतकऱ्यांनी सौदेच काढणे बंद करत बाजार समितीच्या कार्यालयात धाव घेतली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)