कोल्हापूरात वारणा बझारमध्ये तिजोरी फोडून 20 लाखांची चोरी 

कोल्हापूर (प्रतिनिधी): पेठवडगाव येथील वारणा बझारच्या डिपार्टमेंट स्टोअर्स मध्ये अज्ञात चोरट्यांनी तिजोरी फोडून सुमारे 20 लाखांची चोरी झाली. नेमके चोरट्यांनी कुठून प्रवेश व बाहेर कसे गेले याबाबत माहिती समजू शकले नाहीत. त्यामुळे पोलिसयंत्रणा चक्रावली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वडगाव-लाटवडे रस्त्या वर वारणा बझारचे डिपार्टमेंट स्टोअर्स आहे येथे इस्लामपूर ते किणी, खोची, दानोळी आदी शाखेची रक्कम येथे रविवारी रात्री ठेवण्यात येते. ही रक्कम सुमारे 22 लाख इतकी होती. या शाखेच्या संरक्षणासाठी सुमारे तीन सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दुसर्या मजल्यावर असणार्यानी तिजोरी कटर, कटावणीच्या सहाय्याने उचकटली. यामध्ये सुमारे 20 लाख रूपये चोरून नेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर याच शाखेत अन्यत्र ठेवलेली 20 लाखांची रक्कम सुरक्षित राहिली.त्यामुळे मोठा अर्नथ टळला.
घटनास्थळी पोलीस निरीक्षक प्रदीप काळे, पोलिस उपनिरीक्षक आसमा मुल्ला आणि अन्य कर्मचाऱ्यांनी जाऊन तपासकार्यास सुरुवात केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

घटनास्थळी ठसे तज्ज्ञ सहाय्यक पोलिस निरीक्षक ए बी पुणेकर यांना एक ठिकाणी ठसा मिळाला आहे. चौरट्यानी जाताना सीसीटीव्हीत टिव्हीचा डीव्हीआर घेऊन गेले आहेत. तसेच हे चोरटे माहितगार व शिक्षित असावेत असा पोलिसांचा कयास आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)