कोल्हापूरात लिंगायत समाजाचा महामोर्चा

लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माची मान्यता देण्याची मागणी

कोल्हापूर- लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माची मान्यता मिळावी या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी अखिल भारतीय लिंगायत समाजाच्यावतीन आज कोल्हापुरात महामोर्चा काढण्यात आला. या मोर्च्या मध्ये महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश राज्यातून हजारो लोक या मोर्च्यांत सहभागी झाले.

मी लिंगायत, माझा धर्म लिंगायत’ असा नारा देत विविध मागण्यांसाठी कोल्हापुरात लिंगायत समाजबांधवांनी महामोर्चाचा एल्गार पुकारला आहे.राज्यभरातून हजारो लिंगायत समाजबांधव कोल्हापुरात दाखल झाले आहेत. कोल्हापूराती ऐतिहासिक दसरा चौकात अखिल भारतीय लिंगायत समाजातर्फे आयोजित महामोर्चाला सकाळी 11 वाजता सुरुवात झाली. लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माची मान्यता मिळावी, अल्पसंख्याकांचा दर्जा मिळावा या प्रमुख मागण्यांसह इतर विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय लिंगायत समाजाच्यावतीने कोल्हापुरात  हा महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे. इतर समाजबांधवांनीही या मोर्चाला उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला आहे. डोक्यावर असणाऱ्या ‘लिंगायत स्वतंत्र धर्म, मी लिंगायत’ या उल्लेखाच्या टोप्या, गळ्यात स्कार्फ आणि हातात महात्मा बसवण्णा यांचे छायाचित्र असलेले भगवे झेंडे घेऊन लिंगायत समाजाचे लोक या मोर्च्यांत मोठ्या संख्येनं सहभागी झाले आहे. गेल्या तीन वर्षा पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री  विनोद तावडे यांनी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आश्वासन दिलं होतं. परंतु अद्याप हे आश्वासन अद्याप पूर्ण झालेला नाही. त्यामुळं या मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन करण्याच नियोजन करण्यात आलय.

आपल्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. हा मोर्चा शांततेत पार पडला. मोर्चा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. मोर्चे दरम्यान पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील दसरा चौकात आले. याठिकाणी त्यांनी लिंगायत महामोर्चाच्या समन्वयक सरलाताई पाटील यांच्या हस्ते मागण्यांचे निवेदन स्वीकारले. यावेळी पालकमंत्री पाटील यांनी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ घेऊन या मागण्यांबाबत समाजाच्या शिष्टमंडळासमवेत चर्चा करू असे आश्वासन दिले.

या मोर्चासाठी शहरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. दसरा चौकाकडे जाणारे मार्ग बॅरेकेटस् लावून बंद करण्यात आले होते. मोर्चासह शहरातील विविध मार्गांवर पोलीस तैनात करण्यात आले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)