कोल्हापूरात मुलाकडून वडिलांचा खून 

कोल्हापूर – गडहिंग्लज तालुक्‍यातील बसर्गे येथे जमिनीच्या वादातून जन्मदात्या पित्याचीच मुलाने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अशोक जानबा चव्हाण (वय 50) असे मृत व्यक्‍तीचे नाव आहे. बसर्गे-नौकूड रस्त्यावर नाईक मळ्याशेजारी त्यांचा मृतदेह आज सकाळी आढळून आला. याप्रकरणी मुलगा ओंकार चव्हाण यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मृत अशोक चव्हाण व मुलगा ओंकार यांचा जमिनीवरून वाद झाला होता. या वादातूनच ओंकार याने आपल्या वडिलावर धारधार शस्त्राने हल्ला करत गळा आवळून क्रुरपणे हत्या केली. सकाळी नौकूड रस्त्यावर मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांना याठिकाणी मृतदेह आढळून आला. त्यांनी तत्काळ हलकर्णी पोलिसांना याची माहिती दिली. अशोक यांच्या गळ्यावर दोरीने आवळल्याचे खून दिसत होती. अन्यत्र ठिकाणी त्याचा खून करुन येथे आणून टाकला असल्याची शक्‍यता पोलीस सूत्रांकडून वर्तवण्यात येत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)