कोल्हापूर: मुंबई आणि पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात लुटमार करणारी टोळी कोल्हापूरच्या उजळाईवाडी महामार्ग पोलीसांनी गजाआड करण्यात यश आले आहे. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूरजवळ ही कारवाई करण्यात आली आहे.
गेल्या महिनाभरात मुंबई आणि पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात लूटमारीच्या अनेक घटना घडल्या होत्या. याप्रकरणी पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा देखील दाखल आहेत. या प्रकरणाचा तपास करताना रेल्वे पोलिसांनी चकवा देऊन लूटमार करणारी टोळी पसार झाली होती. या टोळीचा शोध घेण्यासाठी त्यांनी महामार्ग पोलिसांची मदत घेतली होती. यासंबंधीचा मेसेज आज सकाळी महामार्ग पोलिसांच्या मुख्यालयातून पास करण्यात आला. तसेच सर्वांना अलर्ट जाण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार कोल्हापूरच्या उजळाईवाडी महामार्ग पोलिसांनी पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर नाकाबंदी केली होती. कोल्हापूरजवळ करण्यात आलेल्या या नाकाबंदीवेळी आंध्रप्रदेश पासिंगची एक गाडी संशयास्पदरीत्या आढळली. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु महामार्ग पोलिसांनी त्यांना पाठलाग करून पकडले. अटक करण्यात आलेले तिघेजण हे आंध्र प्रदेशचे रहिवाशी आहेत. या तिघांकडून तीन मोबाईल आणि एक चारचाकी वाहइ जप्त करण्यात आले आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा