कोल्हापूरात इमारतीची गॅलरी कोसळली, जीवितहानी नाही

कोल्हापूर – कोल्हापूर शहरातील वर्दळीच्या महाद्वार रोडवरील जोतिबा रोड कॉर्नरवरील दुमजली जुन्या इमारतीची गॅलरी सोमवारी सकाळी कोसळली. या ठिकाणी धोकादायक इमारतीचा फलक असल्याने त्याच्या आजूबाजूला कोणी उभे राहत नव्हते; त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. महाद्वार रोडवरील जोतिबा रोड कॉर्नरजवळच रुपशी शहा यांची दुमजली जुनी इमारत आहे.

शहा यांनी मूळ मालकाकडून 2011 मध्ये खरेदी केली आहे. या इमारतीची आयुष्यमर्यादा संपली असल्याने ती धोकादायक असल्याची नोटीस महापालिका प्रशासनाने सातवेळा दिली आहे; परंतु या इमारतीमध्ये जगन्नाथ पाटील हे कुळ म्हणून राहत आहे. त्यांच्यात आणि शहा यांच्यात न्यायालयीन लढाई सुरू आहे; त्यामुळे न्यायालयाने ही इमारत उतरण्यासाठी स्थगिती दिली आहे. इमारतीमध्ये जगन्नाथ पाटील हे राहत आहेत.

तर शहा यांचे खाली औषध दुकान आहे. त्यांनाही या ठिकाणी वास्तव्य करू नये, जीवितास धोका असल्याची सूचना लेखी दिली आहे. परंतु न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याने पाटील आणि शहा यांनी त्याकडे दूर्लक्ष केले आहे. सोमवारी पहाटेपासून मुसळधार पाऊस शहरात झाला. त्यामुळे सकाळी अकराच्या सुमारास या इमारतीची दुसऱ्या मजल्यावरील दर्शनी गॅलरी रस्त्यावर कोसळली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)