कोल्हापूरातील बेकायदा बांधकामावरील कारवाईचा मार्ग मोकळा

राज्य सरकारकडून कारवाई रोखण्याचा आदेश मागे
मुंबई – तावडे हॉटेल ते गांधीनगर रोडवर परिसरातील महापालिकेच्या जागेत उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांविरोधात पालिकेने सुरू केलेली कारवाई रोखण्याचा आदेश राज्य सरकारने अखेर मागे घेतला. न्यायालयाने फटकारल्यानंतर 17 एप्रिल रोजी कारवाईला थांबविण्याचा दिलेला आदेश मागे घेत असल्याचे सरकारी वकील ऍड. निखिल साखरदांडे यांनी न्यायालयाला सांगितले. राज्य सरकारने स्थगिती आदेश मागे घेतल्याने या बांधकामांविरोधात कारवाई करण्याचा कोल्हापूर महापालिकेचा मार्ग मोकळा झाला आहे.

या परीसरातील बेकायदा बांधकामांविरोधात पीालकेने सुरू केलेली कारवाई रोखण्यात आल्याने सामाजीक कार्यकर्ते भरत सोनावणे यांच्या वतीने ऍड. भूषण मंडलीक यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल दाखल करून या बेकायदा बांधकामांविरोधात कारवाई करण्याची विनंती न्यायालयाला केली. या याचिकेची गंभर दखल घेऊन न्यायालयाने कालच्या सुनावीत राज्य सरकारला चांगलेच घारेवर धरले होते. पालिकेच्या कारवाईत सरकारचा हस्तक्षेप कशा साठी असा सवाल उपस्थित करून कारवाई रोखण्याच्या आदेशाची फाईल सादर करण्याचे आदेश दिले होत.

आज या याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठा समोर सुनावणी झाली. यावेळी सरकारच्यावतीने ऍड निखिल साखरदांडे यांनी राज्य सरकारने कारवाईला स्थगिती देण्याचा आदेश मागे घेतल असल्याचे लेखी अर्ज न्यायालयात सादर केला. तसेच पालीकेला नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश द्या अशी विनंती केली. यावर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. पालीका नियमानुसार कारवाई करत नाही का? असा सवाल उपस्थित करून या प्रकरणात आम्हाला खोलात जायला देऊन नका. राज्य सरकारने ज्या पध्दतीने हे प्रकरण हाताळले आहे त्यात आम्ही जात नाही. अशा शब्दात राज्य सरकारला खडे बोल सुनावताना पालीकेला कारवाई करण्याची मुभा दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)