कोल्हापूरमधून चोरलेल्या दुचाकीसह चोरटा ताब्यात

कराड : जप्त केलेली दुचाकी आणि संशयीतासमवेत सपोनि चंद्रकांत माळी व पोलीस कर्मचारी.

आगाशिवनगरमध्ये तालुका पोलिसांची कारवाई
कराड, दि. 30 (प्रतिनिधी) – पैसे चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या चोरट्याने गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल त्याच्या मित्राने कोल्हापूरातून चोरून आणल्याचे उघडकीस आल्याने सागर उत्तम लाखे (रा. दांगटवस्ती, आगाशिवनगर-मलकापूर, ता. कराड) यास तालुका पोलिसांनी ताब्यात घेऊन शाहूपुरी पोलिसांकडे वर्ग केले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोळे (ता. कराड) येथील दादा तानाजी शिंदे यांच्या घरात घुसून पॅन्टच्या खिशातील पैसे चोरण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ओंकार दीपक सातपुते (वय 18, रा. दांगटवस्ती, आगाशिवनगर) यास अटक करण्यात आली होती. त्याच्याकडील दुचाकीबाबत चौकशी केली असता ती गाडी सागर लाखे याची असल्याचे संशयीताने सांगितले. अधिक तपासात गाडीची नंबरप्लेट डुप्लिकेट असल्याचे आढळून आले. तसेच मोटरसायकल चोरीची असल्याचा संशय बळावल्याने ओंकार सातपुतेचा मित्र सागर लाखे यास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता दि. 22 नोव्हेंबर रोजी कोल्हापूरातील अपार्टमेंटच्या पार्किंगमधून दुचाकी चोरल्याची तसेच गाडीचा रंग आणि नंबरप्लेट बदलल्याची कबुली त्याने दिली.
गाडी मालक प्रदीप प्रतिक भोसले (रा. शिरोली टोलनाका) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीस गेल्याची फिर्याद नोंद केली होती. त्यानुसार संशयीत आणि त्याच्याकडून जप्त केलेली दुचाकी शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली. तालुका पोलीस निरीक्षक अशोक क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सपोनि चंद्रकांत माळी, अमित पवार, शशिकांत काळे, सज्जन जगताप, शशिकांत घाडगे, विजय म्हेत्रे यांनी ही कारवाई केली. या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांनी त्यांचे अभिनंदन केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)