संग्रहित छायाचित्र

पंचगंगेची इशारा पातळीकडे वाटचाल
कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील भागात पावसाने जोर धरल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून पूर आला आहे. पुराचे पाणी शहरात घुसत आहे. शुक्रवारी सायंकाळी गायकवाड वाड्यापर्यंत पाणी आल्याने गंगावेश मार्गे शिवाजी पुलावरून होणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 63 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

कोल्हापूर शहरात काळाच्या तुलनेत आज पावसाचे प्रमाण काहीसे कमी होते. पाणलोट क्षेत्रात पावसाचा मुक्काम कायम आहे. यामुळे पंचगंगेसह सर्व नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळीत 24 तासांत 4 फुटांनी वाढल्याने पंचगंगेला पूर आला आहे. पूर पाहण्यासाठी नागरिक नदीकडे धाव घेत आहेत. गायकवाड वाडा, उत्तरेश्वर, कुंभार गल्ली येथे पाणी आले आहे. त्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

11 फुटाची मगर पकडली
सैनिक टाकळी (ता. शिरोळ) येथील टाकळी खिद्रापूर रस्त्यावर शेतवडीत 11 फुटांची मगर आढळली. तिला वन विभाग महसूल यंत्रणा व वाईल्ड लाईफ कॉन्झरवेशन संस्थेच्या कार्यकर्त्यानी पकडण्यात यश मिळवले. नदीला पूर आल्यामुळे खिद्रापूर रस्त्यावरील ओढ्यातून ही मगर शेतवस्तीत असलेल्या वनकोरे देसाई यांच्या घरासमोरून मुख्य रस्त्यावर आली होती. रात्री कामावरून राजापूरवाडीकडे जाणाऱ्या दोघा युवकांना मगर दिसली. त्या युवकांनी वस्तीवरील लोकांना याची माहिती दिली. त्यानंतर वन विभागाशी संपर्क साधण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)