कोल्हापूरजवळ दोन अपघात : एक ठार, 17 जण जखमी

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातांत एक ठार आणि 17 जण जखमी झाले. हे अपघात गुरुवारी पहाटे झाले. कुरुंदवाड-भैरववाडी-नांदणी मार्गावर गणेश बेकरीच्या कामगारांना घेवुन नांदणीच्या दिशेने जाणारी बस उलटून एका कामगाराचा मृत्यू झाला. काशीनाथ शशिकांत बेरड (वय 28 रा. नवे दानवाड) असे त्याचे नाव आहे. बसमध्ये एकुण 40 कामगार प्रवास करत होते. या कामगारापैकी 15 महिला जखमी झाल्या आहेत.

सूरज लकडे यांची ही बस असून दानवाड, टाकळी, राजापुर, कुरुंदवाड या भागातील बेकरी कामगारांना घेऊन कुरुंदवाड येथून निघाली होती. बेकरीत वेळेत पोहोचावयाचे असल्याने चालक दत्ता बले (रा. नांदणी) हा बस भरधाव वेगाने हाकत होता. कुरुंदवाडीपासून 5 कि.मी. अंतरावर असलेला अरुंद पुल ओलांडताना त्याचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कुरुंदवाड-नांदणी रस्त्यालगतच्या टोपले-पाटील यांच्या शेतात बस घुसली आणि उलटली.या अपघातात चालकाच्या शेजारी बसलेल्या काशीनाथ बेरड या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर बसमधील 15 महिला जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

दुसऱ्या अपघातात कोल्हापूरकडे येणाऱ्या शिवशाही बसने दुभाजक ओलांडून कोल्हापूरहून सांगलीकडे जाणाऱ्या एसटीला हातकणंगले तालुक्‍यातील चोकाक येथे धडक दिली. या अपघातात वाहकासह दोघेजण किरकोळ जखमी झाले असून त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल केले आहे. सकाळी 7 वाजून 45 मिनिटांनी हा अपघात झाला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)