कोल्हापूरच्या संगम चित्रपटगृहाचा परवाना रद्द; अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई

कोल्हापूर – परवान्याच्या अटी व शर्तींचा भंग करून चित्रपटगृहाची इमारत पाडल्याबद्दल जुन्या पुणे-बंगलोर रोडवरील संगम चित्रपटगृहाचा परवाना रद्द करण्याची कारवाई अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांनी केली आहे. चित्रपटगृहाच्या  मालकाला  ५ हजार रुपयांचा दंड ही करण्यात आला आहे.

संगम चित्रपटगृहाचे मालक सूर्यकांत पाटील-बुदिहाळकर यांनी शासनाची कोणतीही परवानगी न घेता चित्रपटगृहाचे बांधकाम पाडल्याबद्दल भ्रष्टाचार विरोधी समितीचे अध्यक्ष सुरेश पोवार यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यानुसार दि. २८ नोव्हेंबर २०१६ ला संबंधित मालकांकडून खुलाशाची मागणी केली होती.

त्यावर त्यांनी चित्रपटगृह चालविणे अशक्य असल्याने दि. १ एप्रिल २०१५पासून खेळ व व्यवसाय बंद केल्याचे कळविले. महाराष्ट्र चित्रपटगृहे नियम १९६६ मधील तरतुदीनुसार मंजूर करण्यात आलेल्या परवानगींच्या अटी व शर्तींचा भंग केलेला आहे तसेच इमारत पाडून ही जागा इतर व्यक्तीस हस्तांतर केल्यामुळे मुंबई सिनेमा (विनिमय) अधिनियम १९५३ च्या ‘कलम ७’मधील तरतुदीनुसार चित्रपटगृह मालक बुदिहाळकर-पाटील यांना ५००० रुपये दंडाची कारवाई अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)