कोल्हापूरच्या “माऊली’ने पटकावली मानाची ढाल

पाटण – माजी सार्वजनिक बांधकाममंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसा निमित्त भरविण्यात आलेल्या जंगी कुस्त्यांना पाटणमध्ये अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. पहिल्या क्रमांकाच्या झालेल्या लढतीत कोल्हापूरच्या गंगावेश तालीम संघाचा माऊली जमदाडे याने सोलापूरच्या योगेश पवारला बॅकथ्रूडावावर चितपट करत मानाची ढाल व दोन लाखाचे रोख बक्षीस पटकावले.

दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती जालन्याच्या विलास डोईफोडे विरूद्ध गारगोटीच्या समीर देसाई यांच्यामध्ये झाली. दोघांमध्ये मोठी चुरस झाली. दोन्ही पैलवानांनी दर्जेदार खेळ केला. मात्र ही कुस्ती अखेर संयोजकांनी वेळेअभावी बरोबरीत सोडविली. दीड लाख रूपयांचे बक्षीस दोन्ही पैलवानांना विभागून देण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तिसऱ्या क्रमांकाच्या एक लाख रूपये बक्षीस आसणाऱ्या कुस्तीसाठी सिकंदर शेख गंगावेश तालीम संघ कोल्हापूर विरूदध विक्रम पारखे हनुमान आखाडा पूणे अशी लढत झाली. यामध्ये विक्रम पारखेचा कोल्हापूरच्या सिकंदर शेखने पराभव केला. चौथ्या क्रमांकाच्या 75 हजार रूपयांच्या कुस्तीसाठी पुण्याच्या मामासाहेब मोहोळ तालमीचा संतोष पडळकर व कोल्हापूृरच्या न्यू मोतीबाग तालीम संघाचा नवनाथ इंगळे यांच्यामध्ये लढत झाली. पहिल्यापासून आक्रमक खेळ करणाऱ्या संतोष पाडळकरने घिसाडा डावावर नवनाथ इंगळेला अस्मान दाखविले.

पाचव्या क्रमांकाच्या कुस्तीसाठी क्रांती कारखाना कुंडलचा पै. संभाजी वळसे विरूद्ध कोल्हापूरच्या मोतीबाग तालीम संघाचा विश्‍वास कारंडे यांच्यामध्ये लढत झाली. अटीतटीच्या झालेल्या या कुस्तीत संभाजी कळसे याने विश्‍वास कारंडेचा पराभव केला. तर सहाव्या क्रमांकाच्या कुस्तीसाठी शिवाजी आखाडा तालीम संघाचा अक्षय मोहिते व क्रांती कारखान्याचा अक्षय कदम यांच्यात लढत झाली. अक्षय कदमने अक्षय मोहितेला बाराव्या मिनीटाला चितपट करून विजय मिळविला.

पाटणमध्ये प्रथमच महिलांच्या कुस्तीचे आयोजन करण्यात आले होते. सुपने गावच्या हर्षदा चव्हाण व चाफळच्या समृद्धी पाटील यांच्यात लढत झाली. यामध्ये समृद्धी पाटीलने हर्षदाचा पराभव केला तर कोल्हापूरच्या जयंती पाटील व किवळच्या वैशाली साळुंखे यांच्यामध्ये महिलांची दुसरी कुस्ती लावण्यात आली त्यामध्ये कोल्हापूरच्या जयंती पाटीलने वैशाली साळुंखेचा पराभव केला.

बाजारमैदान या ठिकाणी झालेल्या कुस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात कुस्ती शौकीनांनी कुस्त्या पाहण्यासाठी गर्दी केली होती. युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर, विश्‍वास शेठ देशमुख, माजी उपसभापती रमेश मोरे, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, हिंदकेसरी पै. संतोष वेताळ, जयवंत सुर्वे, पै. तानाजी चवरे, नानासो पाटील, आनंदा शिंदे, रमेश पाटील, पै. दिलीप पवार, पै. धनाजी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

विजेत्यांना सत्यजितसिंह पाटणकर यांच्या हस्ते बक्षीस व मानाची गदा देण्यात आली. पै.गणपतराव लोहार, पै.सय्यदभाई हकीम, पै. विष्णू घाडगे, पै.दिनकरराव धामणकर, पै. गणपतराव साळुंखे, आण्णा सुर्वे, पै. सुरेश सत्रे, मधुकर घाडगे, पांडुरंग पाटील, रमेश डिगे, सतिश शिर्के, सुरेश पाटील, ज्ञानदेव साळुंखे, रघुनाथ कवरबाळा यांनी नियोजन केले होते. निवेदक म्हणून पै. ईश्‍वर पाटील, पै. सुरेश जाधव, पै. मधुकर घाडगे यांनी हालगीवादक म्हणून सचिन आवळे गारगोटी तुतारीवादक मिलींद गुरव यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)