कोल्हापूरच्या अंजना तुरंबेकरचे यश

मुंबई : कोल्हापूरची अंजना तुरंबेकर हिने आशियाई फुटबॉल कॉन्फेडरेशनची ए लायसन्स कोचिंग परीक्षा उत्तीर्ण केली आहे. ही परीक्षा उत्तीर्ण होणारी अंजना ही महाराष्ट्राची पहिली महिला ठरली आहे.

देशभरात याआधी सातच महिलांना फुटबॉल प्रशिक्षक म्हणून ए लायसन्स मिळवता आले होते. त्यामुळे अंजनाने ए लायसन्स फुटबॉल प्रशिक्षक म्हणून मिळवलेले यश कौतुकास्पद ठरले आहे. अंजना ही मूळची कोल्हापुरातील गडहिंग्लज तालुक्यातल्या बेकनाळ गावची आहे.

अंजनाने एकोणीस वर्षांखालील वयोगटाच्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. फिफाच्या अंडर सेव्हन्टिन विश्वचषकाच्या कालावधीत मिशन इलेव्हन मिलियन या मोहिमेची तांत्रिक प्रमुख म्हणूनही तिने काम पाहिले आहे.
आता ए लायसन्स फुटबॉल प्रशिक्षक या नात्यानं अंजना तुरंबेकरला आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय किंवा व्यावसायिक संघाला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी मिळू शकते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)