कोल्हापुरात 3 एकरात 30 कोटीचे महाराष्ट्रातील पहिले अद्ययावत कृषि भवन उभारणार -पालकमंत्री चंद्रकांत पाटील

संग्रहित छायाचित्र

कोल्हापूर / प्रतिनिधी: कोल्हापुरात शेंडापार्क येथे तीन एकर जागेत 30 कोटी रुपये खर्चाचे महाराष्ट्रातील पहिले अद्ययावत कृषि भवन उभारणार असल्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे बोलताना केली.
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 69 व्या वर्धापन दिन समारंभात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. छत्रपती शाहू स्टेडियम येथे झालेल्या या ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे आदी मान्यवर आणि ज्येष्ठ स्वातंत्र सैनिक उपस्थित होते.

शेतकऱ्यांना लवकरच ऑनलाईन 7/12 देणार-पालकमंत्री
शेतकरी खातेदारांना ऑनलाईन 7/12 देण्याच्या कामास राज्य शासनाने प्राधान्य दिले असून येत्या एक दोन महिन्यात डिजिटल स्वाक्षरीसह ऑनलाईन 7/12 देण्याचे काम मार्गी लागेल, असा विश्वास व्यक्त करुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, यंदा कोल्हापूर जिल्ह्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत 477 कोटी 56 लाखाचा आराखडा तयार केला असून नाविन्यपूर्ण योजनेसाठी 7 कोटीची तरतुद केली आहे. यामध्ये अनेकविध नाविन्यपूर्ण योजनांसाठी तरतुद केली असून मृत्यूंजयकार शिवाजी सावंत स्मृती दालनासाठी 50 लाखाच्या तरतुदीचा समावेश आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जिल्ह्यात राबविलेल्या शौचालय अभियानातून शिल्लक राहिलेल्या 28 कोटी रुपयांच्या निधीतून पंचगंगा काठावरील गावांना शुध्द पाणी देण्यासाठी आरओ पँल्ट देण्याबरोबरच 4-5 गावांचे क्लस्टल तयार करुन सांडपाणी शुध्दीकरणाचा प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. जिल्ह्यात हगणदारीमुक्तीचा महत्वकांक्षी प्रकल्प यशस्वी झाला असून जिल्ह्यातील 1029 ग्रामपंचायती हगणदारीमुक्त झाल्या आहेत. कोल्हापूर जिल्हा हागणदारीमुक्तीत देशात पाचवा तर स्वच्छता दर्पण देशात पाचवा असल्याचेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)