कोल्हापुरात शेतकऱ्यांनी बाजार समितीला ठोकलं टाळे

शेतकऱ्यांचा मार्केट समिती समोर ठिय्या आंदोलन…

कोल्हापूर: कोल्हापुरातील मार्केट यार्ड मध्ये गेली दोन दिवस हमाल आणि  तोलाईदार व्यापारी  यांच्या कामाच्या तासा वरून वाद सुरू झाल्याने हमालानी बंद पुकारला होता . या बंदचा फटका आता गूळ उत्पादक शेतकऱ्यांना बसायला लागलेला आहे . हमाल आणि तोलाईदार व्यापारी यांनी हे आंदोलन त्वरित थांबवून पुन्हा पूर्ववत कामकाज सुरू करावे यासाठी आज सकाळी शेतकऱ्यांनी मार्केट समिती समोर ठिय्या आंदोलन केलं .तर आक्रमक शेतकऱ्यांनी बाजार समितीला टाळे ठोकलं. यामुळे वादात आणखी भर पडली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कोल्हापुरातील मार्केट यार्ड मध्ये काम करणारे हमाल आठ तास काम करत आहेत . मात्र गुळाच्या गाड्या भरण्यासाठी जर वेळ लागला किंवा एखादी गुळाची गाडी वेळाने आली तर हमाल केवळ आठ तासच काम संपवून निघून जातात. उरलेलं काम किंवा ती गाडी भरली जात नाही. त्यामुळे मार्केट यार्डमधील तोलाईदार व्यापारी यांनी हमाल संघटनांना यासंदर्भात विनंतीही केली होती. यावरून हमाल आणि तोलाईदार व्यापारी  यांच्यामध्ये गेली दोन दिवस धुसफूस सुरू आहे. केवळ आठ तास काम करणार असा पवित्रा हमाल यांनी घेतल्यामुळे शेतकऱ्यांचा गुळ रस्त्यावर पडून राहत आहे. नुकसान होऊ नये यासाठी गूळ उत्पादक शेतकऱ्यांनी हमाली तोलाईदार व्यापारी यांना विनंती करून  गुळाच्या गाड्या भरण्याची विनंती केली होती. मात्र आपल्या मागण्यांवर ठाम राहिल्यानं आज संतापलेल्या शेतकऱ्यांनी कोल्हापुरातील मार्केट यार्ड परिसरात ठिय्या आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केली. आक्रमक शेतकऱ्यांनी बाजार समितीला टाळे ठोकलं.

आधीच गुळाला हमीभाव नाही आणि बाजारात योग्य दर मिळत नाही त्यामुळे गूळ उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. त्यातच यार्डात आणलेला गुळ वेळेत गाडीत भरला नाही किंवा गाडीतून उतरला नाही तर गुळाचे नुकसान होत आहे. त्यामुळे हमाल आणि तोलाईदार व्यापारी यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन आपला वाद संपवावा अशी मागणीही शेतकर्‍यांच्या वतीने करण्यात आलेली आहे. अवघ्या तासाभरात शेतकरी आणि प्रशासन यांच्यात झालेल्या चर्चे नंतर प्रशासनाला जाग आली आणि सौदे पुन्हा सुरू केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)