कोल्हापुरात लसीकरण मोहीमेला सुरुवात

कोल्हापूर –  जागतिक इम्यूनायझेशन आठवडा  24 एप्रिल  ते ३० एप्रिल निमित्त इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक कोल्हापूरचे  विशेषज्ञ भारतातील  पाच वर्षांखालील मुलांचे आयुष्य वाचविण्यासाठी राष्ट्रीय लसीकरणास साहाय्य करत आहे. या उपक्रमाची सुरुवात कोल्हापुरातून करण्यात आली.दरम्यान २०३० पर्यंत देशात  नवजात बालकांचा मृत्यू दर १००० मागे १२ तर पाचवर्षाखालील  बालकांचा  मृत्यू दर १००० मागे २५ या प्रमाणे कमी करण्याचे लक्ष्य आहे.

यावेळी बोलताना डॉ. हेमंत भारती म्हणाले, बालकांचा मृत्यूदर थांबवण्यासाठी लसीकरण हे सर्वात शक्तिशाली साधन आहे. निरंतर आणि तीव्र लसीकरण कार्यक्रमांद्वारे, आम्ही स्मॉल पॉक्स आणि पोलियो सारख्या घातक रोगांपासून जगाला यशस्वीपणे मुक्त केले आहे. आणि आता आम्हाला रोगांमुळे बालकांचा मृत्यू दर घटवणाऱ्या लसीकरणला महत्व देणे आवश्यक आहे.

निमोनिया आणि डायरिया देशातील घातक आजार असून, पाच वर्षाखालील बालकांच्या मृत्यूचे सर्वाधिक मोठे कारण आहे. आयएपी विशेषज्ञानी इंटरनॅशनल वॅक्सीन एक्ससेस सेंटर (आय वीएस) २०१७  मध्ये निमोनिया आणि डायरियाच्या प्रोग्रेस रिपोर्ट आकड्यांचा उल्लेख केला ज्यात भारतात निमोनिया आणि डायरिया  विरुद्ध  लसीकरण कार्यक्रमाच्या विस्ताराने ९०,००० बालकांचा मृत्यू  आणि  प्रत्येक वर्षी १ अरब डॉलर बचत होऊ शकते असं म्हटलं आहे.याचकरता निमोनिया आणि डायरिया विरोधात व्यापक लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)