कोल्हापूर  – राजा परांजपे प्रतिष्ठानच्या वतीने नवव्या ‘राजा परांजपे महोत्सवा’चे उद्घाटन आणि ‘राजा परांजपे सन्मान पुरस्कार’ वितरण खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कला अवगत करण्यासाठी बरेच परिश्रम घ्यावे लागतात. त्यातून कलेची निर्मिती होते. त्यामुळे कलाकारांनी कलेचा आदर करावा. कोणापुढे झुकू नये, असे प्रतिपादन खासदार संभाजीराजे यांनी केले.राजा परांजपे प्रतिष्ठानच्या वतीने नवव्या ‘राजा परांजपे महोत्सवा’चे उद्घाटन आणि ‘राजा परांजपे सन्मान पुरस्कार’ वितरण खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते झाले; त्याप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

कोल्हापुरात संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात दिग्दर्शक राजेश मापुस्कर, अभिनेते संजय नार्वेकर, गायक अवधूत गुप्ते, अभिनेत्री निर्मिती सावंत यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी महापौर स्वाती यवलुजे  उपस्थित होत्या. हा महोत्सव शुक्रवारपर्यंत सुरू राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)