कोल्हापुरात महापौर फुटबॉल चषक स्पर्धेचं आयोजन

कोल्हापूर – कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने महापौर फुटबॉल चषक स्पर्धा दि.18 एप्रिल ते 4 मे 2018 या कालावधीत भरविली जाणार आहे. या स्पर्धेमध्ये शहर हद्दीतील 17 नामांकित संघाचा सहभाग असणार आहे. विजयी संघास रुपये 1.00 लाख व चषक, उपविजेत्या संघास 50 हजार व चषक, तसेच तृतीय विजयी संघास रुपये 20 हजार व चतुर्थ संघास रुपये 15 हजार असे बक्षीसाचे स्वरुप असणार आहे.

चालू वर्षी प्रथमच सहभागी सर्व संघाना रोख रक्कमेचे बक्षीस देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. तसेच उत्कृष्ट  गोलकिपर, उत्कृष्ट  डिफेन्स, उत्कृष्ट  हाफ, उत्कृष्ठ फॉरवर्ड खेळाडूस प्रत्येकी रुपये 5 हजार व चषक व संपुर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट  खेळाडूस रुपये 10 हजार व चषक असे बक्षीस देण्यात येणार आहे. स्पर्धेतील पहिल्या फेरीत बाद होणाऱ्या आठ संघास प्रत्येकी रुपये 5 हजार व दुसऱ्या फेरीत बाद होणाऱ्या चार संघास प्रत्येकी रुपये 10 हजार रुपयांचं बक्षीस देण्यात  येणार आहे.सर्व फुटबॉल स्पर्धा या बाद पध्दतीने खेळविण्यात येणार आहेत. कोल्हापूर स्पोटर्स असोसिएशन व कोल्हापूर सॉकर रेफ्री असोसिएशन यांचे नियमानुसारच पार पडतील. पहिले चार दिवस दुपारी 2.00 व 4.00 वाजता असे दररोज दोन फुटबॉल सामने होतील. त्या  पुढील आठ दिवस दुपारी 4.00 वाजता प्रत्येकी एक सामना होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)