कोल्हापुरात मराठा संघटनांतर्फे रविवारी गोलमेज परिषद

संग्रहित छायाचित्र

कोल्हापूर – मराठा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी शिवाजी चौकात सुरू असलेल्या शौर्यपीठाच्या ठिकाणी बैठक घेऊन येत्या रविवारी (दि. 2) शिवाजी मंदिरात सर्व मराठा संघटना पदाधिकाऱ्यांची गोलमेज परिषद घेण्याचे ठरविण्यात आले. त्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. दरम्यान, गुरुवारपासून शौर्यपीठाच्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सह्यांची मोहीम राबविण्यात येत आहे, असे शौर्यपीठाचे कार्यकर्ते प्रसाद जाधव यांनी सांगितले.

विविध संघटनांनी शौर्यपीठाला भेट देऊन पाठिंबा व्यक्‍त केला. यामध्ये मराठा क्रांती संघटना, छावा संघटना, मराठा रियासत, हिंदू एकता, राजमाता जिजाऊ ब्रिगेड, शिवक्रांती युवा सेना, राजमुद्रा शेतकरी संघटना, शिवशाहू संघटना, मराठा विकास संघटना, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिग्रेड, मानवाधिकार संघटना आदी संघटनांचा समावेश होता. यानंतर सुरेश पाटील, माजी आमदार सुरेश साळोखे, रविकिरण इंगवले, राजू सावंत, फत्तेसिंग सावंत, बाळ घाटगे यांनी मनोगत व्यक्‍त केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बैठकीत शहरातील तालीम संस्था, सर्व तरुण मंडळांचे कार्यकर्ते यांची गोलमेज परिषद आयोजित करण्याचे ठरविण्यात आले. यावेळी उदय लाड, राजू जाधव, शिवाजीराव लोंढे, परेश भोसले, लालासो गायकवाड, फिरोजखान अत्तार, जयदीप शेळके, राजेंद्र चव्हाण, प्रकाश सरनाईक आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)