कोल्हापुरात तीन खंडणीखोर जेरबंद

कोल्हापूर-  उजळाईवाडी येथील एका पानटपरी चालकास जिवे मारण्याची धमकी देऊन दर आठवड्याला एक हजार रुपये खंडणी मागणाऱ्या तिघा सराईत खंडणीखोरांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून अन्य काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. अलंकार अभिजित मुळीक (वय १९ रा. जाधव कॉलनी, उजळाईवाडी), विशाल उर्फ गोट्या अविनाश माने (१९, रा. राजारामपुरी १४ वी गल्ली), विशाल प्रकाश वडर (२० रा. राजारामपुरी १२ वी गल्ली) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. किशोर राजाराम ढोकरे (रा. तुळजाभवानीनगर, उजळाईवाडी) यांनी त्यांच्या विरोधात  पोलिसात तक्रार दिली आहे.

किशोर ढोकरे यांची उजळाईवाडी येथील शाहू टोल नाक्याजवळ सूर्या नावाची पानटपरी आहे. ३ मार्च, २०१८ मध्ये तीन तरुण पानटपरीवर आले. त्यांनी किशोर यांना दमदती करत, ‘तुला या ठिकाणी पानटपरी चालवायची असेल तर दर आठवड्याला एक हजार रुपये खंडणी द्यावी लागेल. जर दिली नाहीस तर दुकान विस्कटून ठार मारणार’, अशी धमकी दिली. या धमकीमुळे घाबरलेले ढोकरे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी गुरुवारी दुपारी तीन खंडणीखोरांना पकडून गोकुळ शिरगाव पोलिसांच्या ताब्यात दिले. तिघेही सराईत गुनहेगार आहेत. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक सचिन पंडित, रमेश डोईफोडे, यशवंत उपराटे, अनिल ढवळे, अनिल पास्ते, उत्तम सडोलीकर, राम कोळी, सुरेश पाटील, यांच्या पथकाने केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
29 :thumbsup:
0 :heart:
22 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
22 :cry:
156 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)