कोल्हापुरात तरुणाची आत्महत्या 

मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याचा आंदोलकांचा दावा! 
कोल्हापूर: करवीर तालुक्‍यातील कणेरीवाडीच्या 25 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्‍कादायक घटना घडली आहे. विनोद परशराम गुदगी असे मृत तरुणाचे नाव आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजले नसून मराठा आरक्षणासाठीच विनोदने आत्महत्या केल्याचा दावा मराठा आंदोलकांनी केला आहे.
मराठा आरक्षणासाठी गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरातील दसरा चौकात आंदोलन सुरू आहे. विनोद याच्या आत्महत्येचे वृत्त येताच आंदोलकांनी सरकारचा निषेध केला. हा मराठा आंदोलनासाठीचा 18 वा बळी असल्याचे सांगत मानवी साखळी करून दसरा चौकात रास्ता रोको केला. दसरा चौकात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आली आहे.
पृथ्वीराज चव्हाणांचा भर पावसात ठिय्या 
यासर्व प्रकारात कॉंग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण दसरा चौकत आंदोलनस्थळी दाखल झाले होते. त्यांनी भर पावसात दसरा चौकात रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. तसेच पोलिसांनी आंदोलकांना शांततेचे आवाहन केले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी मृतांच्या नातेवाईकांची सीपीआर हॉस्पिटल इथे जाऊन भेट घेतली असून त्यांचे सांत्वन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)